Breaking News

गाणं गात असताना प्रसिद्ध गायिकेवर गोळीबार…नेमकं काय घडलं?

Advertisements

प्रसिद्ध भोजपुरी गायिका निशा उपाध्याय हिच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. निशा लाइव्ह इव्हेंटचे सादरीकरण करीत असताना झालेल्या गोळीबारात तिला गोळी लागली आहे. बिहारमधील सारण येथे इव्हेंटमध्ये गाणं गात असतानाच निशाला गोळी लागली आहे. गोळी लागल्यानंतर निशाला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Advertisements

वृत्तानुसार, मंगळवारी(३० मे) लाइव्ह इव्हेंट दरम्यान काही लोकांनी हवेत गोळीबार केला. या गोळीबारात गाणं गात असलेल्या निशाच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. या घटनेत निशाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या तिच्यावर पटना येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.

Advertisements

परंतु, या घटनेबाबत कोणतीही तक्रार अद्याप करण्यात आलेली नाही. गोळीबार कशाप्रकारे करण्यात आला आणि तो कोणी केला? याबाबत पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बिहारमधील सारण या गावात एका सांस्कृतिक कार्यक्रमात निशा गाणं गाण्यासाठी गेलेली असताना ही घटना घडली. निशा ही भोजपुरीमधील प्रसिद्ध गायिका असून ती लोकगीतांसाठी ती ओळखली जाते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरात बटाटा-कांदा विक्री कार्यालयात देहव्यापार

नागपुरात आतापर्यंत ब्युटीपार्लर, स्पा, मसाज पार्लर, पंचकर्म केंद्र आणि सलूनमधेच देहव्यापार होत असल्याचे समोर आले …

जिल्हाधिकाऱ्यांचे छायाचित्र वापरून नागरिकांकडे पैशांची मागणी

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे छायाचित्र वापरून ‘व्हॉट्स ॲप’वर आरोपीने बनावट खाते उघडले. या खात्यावरून नागरिकांकडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *