Breaking News

बिबट्याची फार्म हाऊसवर शिकार

Advertisements

पुण्यातील खडकवासला धरणतीरावरील मांडवी खुर्द (ता. हवेली) परिसरात बिबट्याची शिकार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील एका बड्या हॉटेल व्यावसायिकावर पुणे वन विभागाने गुन्हा दाखल केला.

Advertisements

गुन्हा दाखल होताच हॉटेल व्यावसायिक फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाची पथके रवाना करण्यात आली आहेत. विश्वजित जाधव असे या व्यावसायिकाचे नाव आहे.

Advertisements

मांडवी खुर्द येथील शेट्टी फार्म हाऊसमध्ये बिबट्याची शिकार करून अवयव लपवून ठेवले असल्याची तक्रार प्रसिद्ध हॉटेलचालकाच्या मुलीने वन विभागाकडे केली होती. त्यानुसार पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, डोणजे वनपरिमंडळ अधिकारी सचिन सपकाळ यांच्या पथकाने विश्वजित जाधव याच्या फार्म हाऊसवर छापा टाकला. फार्म हाऊसची तपासणी करण्यात आली असता, कपाटात बिबट्याच्या नख्यांसह पंजा आढळला. सराईत शिकार्‍याने बिबट्याला ठार मारले असावे, असे वन अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नरेंद्र मोदी विचारमंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशीभूषण देसाई यांचा हजारो कार्यकर्त्यांसह हिंदु महासभा पक्षात प्रवेश

नरेंद्र मोदी विचारमंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशीभूषण देसाई यांचा हजारो कार्यकर्त्यांसह हिंदु महासभा पक्षात प्रवेश …

राज्यात 15 एप्रिलनंतर पुन्हा पाऊस?

हवामानात का झाले बदल   हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हवामान झालेल्या या बदलाचे कारण आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *