Breaking News

पिंपरी चिंचवडमध्ये दीड महिन्याच्या चिमुकल्यासह चार वर्षाच्या बाळाची कोरोनावर मात

पिंपरी चिंचवडमध्ये दीड महिन्याच्या चिमुकल्यासह चार वर्षाच्या बाळाची कोरोनावर मात
पुणे : ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पिंपरी चिंचवड : कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातचं सर्वांचं मनोबल वाढवणारी एक सकारात्मक घटना शहरात घडली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून कोरोना बाधित दीड महिन्याच्या बाळाला आणि त्याच्या 4 वर्षाच्या मोठ्या भावास 14 दिवसांच्या उपचारानंतर सुखरूप घरी सोडण्यात आले. ते दोघेही कोरोना पॉझिटीव्ह होते, ते संभाजीनगर, चिंचवड येथील रहिवासी आहेत.

मुंबईला डिलिव्हरीला गेलेली आई एक महिन्यांनी पुण्याला परत आली. पण, बाळाला ताप आल्यामुळे वाय.सी.एम.रुग्णालय येथे दाखल केले होते. तेथे तपासणी केली असता बाळ व मोठा भाऊ दोघेही पॉझिटीव्ह आले. तसेच आजोबा सुद्धा पॉझिटीव्ह आले होते. तर आईचा अहवाल निगेटीव्ह आला होता. यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील बालरोग विभागात त्यांच्यावर उपचार केले. त्यातून ते संपूर्ण बरे झाले आहेत. या दीड महिन्याच्या बाळासह त्याच्या चार वर्षांच्या भावाला पूर्ण बरे करण्यासाठी वैद्यकिय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे व डॉ. अनिकेत लाठी यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग विभाग प्रमुख डॉ. दीपाली अंबिके, वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या हरिभक्त, डॉ. सीमा सोनी, डॉ सूर्यकांत मुंडलोड,डॉ. नुपूर कत्रे, डॉ. शीतल खाडे, डॉ. प्राजक्ता कदम, डॉ. गौरव शर्मा, डॉ. सबाहत अहमद, डॉ.अभिजीत ब्याले, डॉ. रिजवना सय्यद, डॉ. कोमल बिजारनिया व सर्व परिचारिका यांचे सहकार्य लाभले.

About Vishwbharat

Check Also

हर शहर गांव के द्वार द्वार पर RSS शताब्दी वर्ष का प्रचार प्रसार चलेगा

हर शहर गांव के द्वार द्वार पर RSS शताब्दी वर्ष का प्रचार प्रसार चलेगा टेकचंद्र …

महामार्गावरील प्रवास महागला : नाक्याच्या टोलमध्ये वाढ

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव-नाशिक-गोंदे या टप्प्यातील सहापदरी मार्गावरील वाहनधारकांचा प्रवास आता महागणार आहे. टोलच्या सध्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *