Tag Archives: चंद्रपूर

कोरोनामुळे जिल्ह्यातील चवथ्या बाधिताचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 856 आत्तापर्यंत 475 बाधित बरे झाले 375 बाधितावर उपचार सुरू चंद्रपूर, दि. 9 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 23 बाधितांची भर पडली आहे. तसेच एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधितांची संख्या 856 झाली आहे. आतापर्यंत 475 बाधित बरे झाले आहे. तर 375 बाधितावर उपचार सुरू आहे. आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये तुकूम पोलीस लाईन येथील संपर्कातून बाधित झालेल्यांची संख्या तीन आहे. यामध्ये 50 वर्षीय पुरुष 24 वर्षीय महिला व …

Read More »

संगणक प्रशिक्षण केंद्रे सुरु करा : खासदार बाळू धानोरकर 

चंद्रपूर : कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मागील पाच महिन्यापासून अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्रे बंद आहेत. त्यामुळे या केंद्रातील कर्मचारी व मालकांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. . शेजारच्या जिल्ह्यांनी देखील हि संगणक  प्रशिक्षण वर्ग सुरु केली आहे. अती व शर्ती लावून चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना केली आहे. शासकीय स्तरावर विविध पदाच्या भरती …

Read More »

मानसिक आरोग्याच्या काळजीसाठी डायल करा 155-398

टेलिफोनिक कॉन्सिलिंगला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन चंद्रपूर, दि.7 ऑगस्ट : जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या काळामध्ये नागरिकांच्या मानसिक आरोग्याच्या काळजीसाठी हॅलो चांदा 155-398 हेल्पलाईन क्रमांक जिल्हा प्रशासनाने जारी केला आहे. नागरिकांना मानसिक आधार देण्यासाठी आत्मभान अभियानांतर्गत टेलिफोनिक कॉन्सिलिंग सुरू झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मानसिक समस्येचे निराकरण करण्यासाठी अर्थात मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी हॅलो चांदा हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल …

Read More »

पशुधनावर लंपी स्किन डिसिज साथीचा प्रादुर्भाव

उसगाव येथे लसीकरण शिबिराचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडच्या युवती विभागाचा उपक्रम, गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या पशुधनावर लंपी स्किन डिसिज या विषाणूजन्य साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच या रोगाबाबत पशुपालकांमध्ये  जनजागृती करण्यासाठी  यंग चांदा ब्रिगेडच्या युवती विभागाच्या वतीने घुग्घुस जवळील उसगाव येते लसीकरण व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उसगावच्या सरपंच्या निविता ठाकरे यांच्या हस्ते …

Read More »

आज फोन इन कार्यक्रमात  जिल्हा शल्य चिकित्सक

कोरोना आणि आरोग्य व्यवस्था विषयीचा संवाद चंद्रपुर,दि. 7 ऑगस्ट: जिल्हा प्रशासनाने कोरोना जनजागृती संदर्भात आत्मभान अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत 5 ऑगस्ट रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी फोन इन कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांशी कोरोना आणि आरोग्य व्यवस्था या विषयावर संवाद साधला होता. या कार्यक्रमाचे प्रसारण दिनांक 8 ऑगस्ट शनिवारला सकाळी 10:30 वाजता आकाशवाणीवरून होणार आहे. जिल्ह्यात …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधिताची संख्या 777

438 जणांना आत्तापर्यंत रुग्णालयातून सुटी 339 बाधितावर सध्या उपचार सुरू चंद्रपूर, दि. 7 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्ण संख्येतील वाढ सातत्याने सुरू असून गेल्या 24 तासात त्यामध्ये 28 बाधिताची भर पडली आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 777 बाधित पुढे आले असून 438 जणांना आत्तापर्यंत रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. तर 339 बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत. आज पुढे आलेल्या बाधितामध्ये 17 नागरिक अँटीजेन …

Read More »