Breaking News

मानसिक आरोग्याच्या काळजीसाठी डायल करा 155-398

Advertisements

टेलिफोनिक कॉन्सिलिंगला

Advertisements

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Advertisements

चंद्रपूर, दि.7 ऑगस्ट : जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या काळामध्ये नागरिकांच्या मानसिक आरोग्याच्या काळजीसाठी हॅलो चांदा 155-398 हेल्पलाईन क्रमांक जिल्हा प्रशासनाने जारी केला आहे. नागरिकांना मानसिक आधार देण्यासाठी आत्मभान अभियानांतर्गत टेलिफोनिक कॉन्सिलिंग सुरू झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मानसिक समस्येचे निराकरण करण्यासाठी अर्थात मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी हॅलो चांदा हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.

नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हॅलो चांदा ही हेल्पलाईन अग्रेसर ठरली आहे. कोरोना संसर्ग काळामध्ये नागरिकांच्या मानसिक समस्या सोडून त्यांचे निराकरण करण्यासाठी हॅलो चांदा हेल्पलाईनला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याद्वारे नागरिकांमध्ये असणारी भीती दूर करून त्यांना मानसिक आधार देण्याचे कार्य टेलिफोनिक कॉन्सिलिंग अर्थात हॅलो चांदा 155 398 या हेल्पलाईन द्वारे करण्यात येत आहे.

नागरिकांना मानसिक दडपण येऊ नये, ताणतणावाचे नियोजन याविषयीची माहिती, समस्यांचे निराकरण, नागरिकांना मानसिक आधार देण्यासाठी आत्मभान अभियानांतर्गत टेलिफोनिक कॉन्सिलिंग सुरू झाली आहे. हॅलो चांदा 155-398 ‌या हेल्पलाईन क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत संपर्क साधून मानसिक आरोग्य संदर्भातील अडचणी दूर करता येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात जनजागृती विषयक आत्मभान अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गतच नागरिकांमध्ये असणारे मानसिक आरोग्य विषयीची समस्या, त्यांच्यामध्ये असणारी चिंता सोडविण्यासाठी मानसिक आरोग्य विषयीची हेल्पलाईन अर्थात टेलिफोनिक कॉन्सिलिंग सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासन आणि सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क यांच्यामध्ये टेलिफोनिक कॉन्सिलिंग संदर्भात परस्पर सामंजस्य करार झालेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासोबत सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्कचे प्राचार्य डॉ.सुनिल साकुरे, प्राध्यापिका डॉ.जयश्री कापसे, प्राध्यापक डॉ.देवेंद्र बोरकुटे यांची प्रशिक्षित समुपदेशकांची चमू टेलिफोनिक कॉन्सिलिंगमध्ये काम बघत आहे. सोबत मनःचिकित्सक डॉ.किरण देशपांडे, समुपदेशक मुग्धा कानगे यांचे सहकार्य  आहे.

नागरिकांमधील असणारी मानसिक समस्येचे निराकरण करण्यासाठी टेलिफोनिक कॉन्सिलिंग महत्वाची भूमिका बजावणार आहे. या टेलिफोनिक कॉन्सिलिंग करण्यासाठी प्रशिक्षित समुपदेशकांची चमू तयार करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी हॅलो चांदा 155-398 ‌ या हेल्पलाईन क्रमांकावर निसंकोचपणे आपल्या समस्या मांडा व समस्येचे निराकरण करण्याचे, आवाहन करण्यात आले आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

कमलिनी जड़ की सब्जी का मटन से अच्छा लजीज स्वाद : चखकर मनपसंद लडका रिश्ता पक्का करेगा!

कमलिनी जड़ की सब्जी का मटन से अच्छा लजीज स्वाद : चखकर मनपसंद लडका रिश्ता …

उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पित असाल तर..!

शरीरातील पाण्याची पातळी राखणे हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे तज्ज्ञ रोज १० ते १२ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *