चंद्रपूर : कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मागील पाच महिन्यापासून अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्रे बंद आहेत. त्यामुळे या केंद्रातील कर्मचारी व मालकांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. . शेजारच्या जिल्ह्यांनी देखील हि संगणक प्रशिक्षण वर्ग सुरु केली आहे. अती व शर्ती लावून चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना केली आहे.
शासकीय स्तरावर विविध पदाच्या भरती प्रक्रिया तसेच इच्छुक उमेदवारांना एम. एस. सी. आय. टी अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करून प्रमाणपत्र मिळणे, प्रमाणपत्र शिवाय अधिकारी व कर्मचारी वंचित आहेत. त्यासोबतच या केंद्रात काम करणारे कर्मचारी व मालक याच व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. परंतु पाच महिन्यापासून बंद असल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
राज्यातील जळगाव, नागपूर, नंदुरबार व शेजारच्या गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी अटी व शर्ती टाकून परवानगी दिली आहे. त्याच प्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील संगणक प्रशिक्षण केंद्रे सुरु करा अशी मागणी खासदार बाळू धानोरकर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना केली आहे.