Breaking News

नागपुरात ‘स्वाईन फ्लू’चे २० रुग्ण व्हेंटिलेटरवर

Advertisements

नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रकोप आटोक्यात आला, मात्र ‘स्वाईन फ्लू’ची दहशत वाढली आहे. पण प्रशासनाकडून नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना होत नसल्यामुळेच व्हेंटिलेटवरील रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील २४ तासांत विविध रुग्णालयांत नवीन १७ स्वाइन फ्लूबाधितांची भर पडली आहे. विविध रुग्णालयात १६७ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत, तर २० रुग्ण व्हेंटिलेटवर आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात स्वाइन फ्लू बाधितावर उपचाराची यंत्रणा नाही. मेडिकल आणि मेयो, एम्ससह खासगी रुग्णालयाच्या भरवशावर स्वाइन फ्लू नियंत्रणासाठी प्रयत्न होत आहेत. एप्रिलपासून तर आतापर्यंत विभागात ४३० स्वाइन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू या दीड महिन्यातील आहेत. तर स्वाइन फ्लू रुग्णांचा आकडा देखील याच महिन्यात फुगला आहे.

Advertisements

अशी आहे संख्या👇

Advertisements

महापालिका हद्दीतील ७७ तर नागपूर ग्रामीणमधील ३८ आणि जिल्ह्याबाहेरील ५० अशा एकूण १६७ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील ८, ग्रामीण भागातील ६ आणि जिल्ह्याबाहेरील ६ असे एकूण २० बाधित व्हेंटिलटवर आहेत. दरम्यान, २४ तासांत शहरात ११, जिल्ह्याबाहेरील (इतर जिल्हे व इतर राज्य) ६ असे एकूण १७ रुग्ण आढळले. नागपुरातील ग्रामीण भागात गुरुवारी एकही स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला नसल्यामुळे प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.कोरोनाचे १९ रुग्ण रुग्णालयांतशहरात २४ तासांत ७, ग्रामीणला ५ असे एकूण १२ नवीन कोरोनाबाधित आढळले. तर दिवसभरात शहरात २६, ग्रामीणला ६ असे एकूण ३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे शहरात गुरुवारी १७१, ग्रामीणला ३७ असे एकूण २०८ सक्रिय कोरोनाबाधित नोंदवले गेले. त्यातील गंभीर संवर्गातील अवघे १९ रुग्ण विविध शासकीय व खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. १८९ रुग्ण गृह विलगिकरणात आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरात ‘बर्ड फ्लू’ : 8500 कोंबड्या आणि अंडी…

नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात बर्ड फ्लूने संक्रमित साडेआठ हजार कोंबड्या मारण्यात आल्या. या …

नागपुरात कॉंग्रेसचा उमेदवार कोण?

नागपूर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी कॉंग्रेसने यावेळी येथून भाजप विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याचे ठरवले आहे. पक्षांतर्फे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *