Breaking News

नागपुरात पक्षी विमानाला धडकला :भाजप, काँग्रेस नेत्यांसाह २७२ प्रवाशांना उतरवले

Advertisements

नागपूरहून कोलकाताकडे निघालेल्या इंडिगो विमानाला पक्षी धडकल्याने काही मिनिटांतच २७२ प्रवाशांना सुखरूप नागपूरला उतरवण्यात आले. उड्डाणानंतर काही वेळातच पक्ष्याची विमानाला धडक बसली यामुळे विमानाचा पुढचा भाग खराब झाला.

Advertisements

 

विमान कोलकात्याला जाणार होते, परंतु वैमानिकाने हवेत यू-टर्न घेण्याचा निर्णय घेतल्याने नागपुरात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या विमानाने आज सकाळी ७ वाजून ५ मिनिटाने उड्डाण घेतली. आकाशात झेप घेताच एका पक्षाने धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षी धडकल्याने विमानाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. या विमानात माजी आमदार सुधाकर कोहळे, शेखर भोयर, काँग्रेस नेते नितीन कुंभलकर प्रवास करत होते.

Advertisements

 

पक्षी धडकल्याच्या अनेक घटना

नागपूरमध्ये विमानाला पक्षी धडकल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे विमानाचे आपातकालिन लँडिंग करावे लागले. विमानाचे नागपूर विमानतळावरून झेपवाताना किंवा विमान हवेत असताना पक्षी धडकले. वैमानिकाने कौशल्य वारून विमान सुरक्षितपणे खाली उतरवले.या घटनांमध्ये २०१८ मध्ये रायपूर ते नागपूर आणि त्यानंतर दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाला नागपूर विमानतळावर लँडिंग करताना पक्षी धडकला. त्यामुळे आपातकालिन लँडिंग झाले.

 

२०२३ मध्ये, नागपूर-पुणे इंडिगो विमानाला टेकऑफ करताना पक्षी धडकला. त्यामुळे उड्डाण रद्द करण्यात आले. इतर अनेक घटनांमध्ये, विमानाला पक्षी धडकताच, वैमानिकांनी विमान त्वरित धावपट्टीवर उतरवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पक्ष्यांच्या धडकेमुळे विमानाचे नुकसान होऊ शकते, तसेच विमानाचे नियंत्रण देखील धोक्यात येऊ शकते. त्यामुळे, विमानाला पक्षी धडकताच, त्वरित विमान लँडिंग करणे आवश्यक आहे.

 

विमान अपघाताचा इतिहास

भारतात १९६२ पासून विमान अपघातांची नोंद आहे. भारतात हवाई अपघातांचे ७ जुलै, १९६२ रोजी आलिटालिया विमानाचे अपघात झाले होते. त्यात ९४ प्रवासी ठार झाले. त्यावेळी भारतातील सर्वात घातक हवाई अपघात ठरला. १ जानेवारी, १७८ एयर इंडिया विमान सांताक्रूज विमानतळ, मुंबईवरून उड्डाण घेतल्यानंतर काही काळात अरबी समुद्रात कोसळले. त्यात २१३ लोक ठार झाले. २१ जून, १९८२ इंडियन एयरलाइन्स विमान भोपाळ विमानतळावर उतरवण्याच्या प्रयत्नात कोसळले. या अपघातात ५५ पैकी ५० प्रवाशांचा मृत्यू झाला.

 

१७ जुलै २००० – अलीन्स एअर विमान पटना विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करताना कोसळले. या अपघातात ६२ प्रवाशांपैकी ६० जणांचा मृत्यू झाला.

 

४ सप्टेंबर २००९ – एअर इंडिया एक्सप्रेस विमान मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, कर्नाटक येथे उतरायचा प्रयत्न करताना कोसळले. या अपघातात तासलेले १६६ प्रवाशांपैकी १५८ मृत्यू झाले.

 

७ ऑगस्ट २०२० – एअर इंडिया एक्सप्रेस विमान केरळमधील करिपूर विमानतळ (कालीकट आंतरराष्ट्रीय विमानतळ) वर उतरायचा प्रयत्न करताना कोसळले. यात १६५ प्रवाशांपैकी २१ जण मृत्यूमुखी पडले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद : शहरातील कोणता भाग प्रभावित होणार? वाचा

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद   कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा खंडित   नागपूरकरांसाठी एक …

BHEL को मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश

BHELको मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *