Breaking News

नागपुरजवळील सोलार कंपनीत भीषण स्फोट : एकाचा मृत्यू, १७ कामगार जखमी

नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत काल मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात १ कामगाराचा मृत्यू झाला असून १७ कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. या भीषण घटनेबाबत आपण जाणून घेऊ या.

 

स्फोटातील सर्व जखमींना नागपूरच्या विविध खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून ४ जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. नागपुरातील बाजारगाव परिसरातील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत काल (३ सप्टेंबर २०२५) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास सोलार एक्स्प्लोसिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. कंपनीतील सीबी वन या प्लांटमध्ये स्फोट होण्यापूर्वी काही प्रमाणात धूर निघत असल्यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांना काहीतरी अगतिक घडेल असा अंदाज आला आणि सर्व कामगारांनी बाहेरच्या दिशेने पळत गेले.

 

मात्र संबंधित प्लांट मधील मयूर गणवीर हे वेळेत बाहेर पडू शकले नाही. तेवढ्यात तिथे जोरदार स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की प्लांटच्या इमारतीचे तुकडे अनेक मीटर लांब पर्यंत उडाले. आणि त्या मलब्याच्या आघाताने अनेक कामगार जखमी झाले. घटनेची माहिती कळताच पोलीस, अग्निशमन दलासह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी रात्री उशिराच घटनास्थळी दाखल झाले. आज सकाळपासून सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या समोर बघ्यांची गर्दी वाढली असून सकाळ पाळीतील कर्मचाऱ्यांना ही आत घेण्यात आलेले नाही.

About विश्व भारत

Check Also

कोराडी येथील श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे मंत्री बावनकुळे यांच्या घरी गणेशउत्सवानिमित्त कार्यक्रम

🌹🌹॥ जय गुरु ॥🌹🌹   सर्व होते केले असता । सर्व मिळते धरिता हाता ।। …

प्रीतम लोहासरवा का ​​संजय गांधी निराधार योजना समिति में सदस्य पद पर चयन

प्रीतम लोहासरवा का ​​संजय गांधी निराधार योजना समिति में सदस्य पद पर चयन   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *