सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॉन्ट्रॅक्टर पी. व्ही. वर्मा यांनी सोमवारी नागपूर येथील राहत्या घरी आत्महत्या केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचे जवळपास 50 कोटी रुपयांचे बिल मंजूर होत नसल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. वर्मा यांच्या आत्महत्येनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांनी सरकारला लवकरात लवकर कंत्राटदारांची थकित बिले मंजूर करण्याची मागणी केली आहे. *राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर बांधकाम कामांची जवळपास 90 हजार कोटी रुपयांची बिले प्रलंबित असल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे.* पी. व्ही. वर्मा हे नागपूरच्या राजनगर भागात राहत होते आणि पीडब्ल्यूडी कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी चांगला लौकिक मिळवला होता. *दक्षिणेतील अभिनेता प्रभास यांचे ते मेहुणे लागत होते.* गेल्या आठवड्यात नागपूरच्या संविधान चौकात सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांनी सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनात पी. व्ही. वर्मा सहभागी झाले होते.
