तब्बल ५० रेल्वेगाड्या धावतील एकट्या मुंबईकडे

मुंबई,२१मे
चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर १ जूनपासून रेल्वेसेवा अंशत: सुरू होणार आहे. सुरुवातीला विशेष २०० गाड्या १ जूनपासून धावणार आहेत. यातील ५० गाड्या एकट्या मुंबईकडे येणाºया आणि जाणाºया असतील. विशेष म्हणजे त्या श्रमिक गाड्या व्यतिरिक्त आहेत, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी येत्या १ जूनपासून रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. दररोज २०० विना वातानुकूलित (नॉन एसी) गाड्या पहिल्या टप्प्यात धावणार आहेत. त्यामुळे रेल्वेने आपल्या स्थानकातील दुकानेही सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही दुकाने उघडण्यासाठी कार्यवाही सुरू करा असे आदेश रेल्वे विभागाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. मात्र, त्यासाठी काही काळजी घेण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत. दुकाने सुरू करतानाच सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्या. कुणाही ग्राहकाला दुकानात बसून वाढण्याची व्यवस्था करू नका, असेही रेल्वे मंत्रालयाने सूचवले आहे.
लॉकडाऊनमुळे गेली दोन महिने सर्व व्यवहार ठप्प पडला होता. आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
कडक नियमावली
* गाडीत एकही अनारक्षित डबे नसतील़ कन्फर्म तिकीट असेल तरच प्रवास करण्याची आणि स्टेशनवर जाण्याची मुभा आहे.
* चादर, ब्लँकेट आणि पडदे दिले जाणार नाहीत.
* एसी ही मध्यम स्वरूपात असेल.
* तिकीट आॅनलाईन करता येईल़ बुकिंग काउंटरवर मिळणार नाही.
* गाड्या त्यांच्या नेहमीप्रमाणे स्टेशनवर थांबतील.
* तत्काळ किंवा गाडीमध्ये तिकीट दिले जाणार नाही.
* गाडीत मास्क घालणे बंधनकारक असेल.
* ताप आहे की नाही (थर्मल स्क्रिनिंग) हे तपासण्यासाठी किमान दीड तास आधी पोहोचणे बंधनकारक आहे. ताप आढळल्यास प्रवास करू दिला जाणार नाही, त्याऐवजी तिकिटाचे पूर्ण पैसे परत दिले जातील.
* जेवण उपलब्ध नसेल़ काही गाड्यांमध्ये बुकिंग केल्यास पाणी आणि मर्यादित वस्तू पुरवल्या जातील.

About Vishwbharat

Check Also

नागपूर, अमरावती, चंद्रपूर, संभाजीनगर महापालिका निवडणुका लांबणीवर

राज्याच्या राजकारणातली आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या नागपूर, मुंबईसह सर्वच महापालिका …

ठाकरेंना धक्का देण्यासाठी बावनकुळे, शेलार अमित शाहांच्या भेटीला

विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. एकनाथ शिंदे आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *