Breaking News

ठाकरेंना धक्का देण्यासाठी बावनकुळे, शेलार अमित शाहांच्या भेटीला

विश्व भारत ऑनलाईन :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेनेसाठी वाद सुरू असतानाच अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक लागली आहे. ठाकरेंसाठी महत्त्वाची मानली जाणारी ही निवडणूक भाजपनेही मनावर घेतल्याचे समजते.

 

या निवडणुकीपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो समोर आला.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. शिंदे गट कुणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता असताना भाजपकडून या जागेवर उमेदवार दिला जाणार आहे. त्यामुळे पक्षफुटीनंतर ही जागा जिंकून भाजप उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या प्रयत्नात असल्याचे राजकीय घडामोडींवरून दिसते.

About विश्व भारत

Check Also

भाजपकडून मतदार यादीत घोळ : काँग्रेस लवकरच करणार घोटाळा उघड

भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना मतदानाचा समान अधिकार दिला असला तरी, सत्ताधारी भाजप सरकार निवडणूक आयोगाचा …

ग्राम प्रधान पुत्र प्रकाश भालेराव BJP वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ संयोजक

ग्राम प्रधान पुत्र प्रकाश भालेराव BJP वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ संयोजक टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *