Breaking News

‘कफ सिरप’ आरोग्यासाठी घातक : कोणी दिला इशारा?

विश्व भारत ऑनलाईन :
जागतिक आरोग्य संघटनेने भारतीय कंपन्यांचे चार कफ सिरप घातक घोषित केले आहेत. हे कफ सिरप हरियाणातील मेडेन फार्मास्युटिकल कंपनी बनवत असल्याचे समोर आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या इशारानंतर आरोग्य विभागाची टीम सोनीपतमधील मेडेन फार्मास्युटिकल कंपनीत पोहोचली. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीची चौकशी सुरू केली. यावेळी कारखान्यात प्रसारमाध्यमांनाही बंदी घालण्यात आली.

डब्ल्यूएचओने बुधवारी इंडियाज मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने बनवलेल्या चार खोकल्याच्या सिरपबाबत अलर्ट जारी केला. डब्ल्यूएचओने म्हटले की, हे सर्दी-खोकल्यावरील सिरप गॅम्बियामध्ये 66 मृत्यू आणि किडीच्या गंभीर समस्यांसाठी जबाबदार असू शकतात.

अहवालानुसार, या सिरपमध्ये डाएथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकॉलची अयोग्य मात्रा असल्याची पुष्टी झाली आहे, जी माणसांसाठी अत्यंत धोकादायक आहेत.

या कफ सिरपमध्ये प्रोमेथाझिन ओरल सोल्युशन, कोफॅक्समॅलिन बेबी कफ सिरप, मॅकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रिप एन कोल्ड सिरप आहेत.

वैद्यकीय प्रोडक्ट्सचा इशारा जारी करताना डब्ल्यूएचओने म्हटलंय की, ‘चारही कफ सिरपच्या नमुन्यांच्या प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलची अयोग्य मात्रा आढळून आली आहे. हे प्रोडक्ट्स आतापर्यंत फक्त गाम्बियामध्येच आढळून आले. परंतु ती इतर देशांमध्येही वितरित केली जाण्याची शक्यता आहे.

सध्या कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसोबत याची चौकशी करतंय.आरोग्य संघटनेने जारी केलेल्या निवेदनात या उत्पादनांचा वापर असुरक्षित असल्याचे वर्णन केले आहे. विशेषत: ही औषधे लहान मुलांसाठी अत्यंत घातक ठरू शकतात. त्यामुळे असं कोणतेही औषध वापरू नका, असं आवाहनही केले आहे.

About विश्व भारत

Check Also

प्राकृतिक संसाधनों की बर्बादी का प्रमुख जिम्मेदार है? जनसंख्या का बोझ

प्राकृतिक संसाधनों की बर्बादी का प्रमुख जिम्मेदार है? जनसंख्या का बोझ   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

“भगवान जगन्नाथांनी वाचवले डोनाल्ड ट्रम्प यांचे प्राण”

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांना कानाला दुखापत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *