Breaking News

गोंदिया विमानतळावरून इंदूर,दिल्ली,बंगळुरू विमानसेवा

गोंदिया जिल्ह्यातील बिरसी येथील विमानतळावरून सध्या इंडिगोची गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती ही विमानसेवा सुरू आहे. यानंतर १६ सप्टेंबर २०२५ पासून गोंदिया-इंदूर-बेंगळुरू या मार्गावर प्रवासी विमानसेवेला प्रारंभ होणार आहे. तर गोंदिया-दिल्ली प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी बालाघाट चे खासदार भारती पारधी यांच्या मागणी पत्रा नंतर केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे या मार्गावर ही लवकरच गोंदियाहून प्रवासी विमान सेवेला प्रारंभ होणार असून ही निश्चित गोंदिया आणि शेजारील मध्यप्रदेश च्या बालाघाट जिल्हावासीयांसाठी ही दिलासा दायक बाब आहे.

 

गोंदिया तालुक्यातील बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तत्कालीन केंद्रीय विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने उभारण्यात आले. यानंतर सन २०२२ मध्ये फ्लाय बिग या कंपनीने गोंदिया-इंदूर या प्रवासी विमान वाहतूक सेवेला सुरुवात केली होती.त्यावेळी प्रवाशांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण काही तांत्रिक अडचणीमुळे ही सेवा वर्षभराच्या आतच बंद झाली. यानंतर गेल्या वर्षीपासून इंडिगो विमान कंपनीने बिरसी विमानतळावरून गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती या मार्गावर विमानसेवा सुरू केली. त्याला प्रवाशांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

यानंतर आता स्टार एअर कंपनीने या विमानतळावरून गोंदिया-इंदूर-बेंगळुरू या मार्गावर १६ सप्टेंबर २०२५ पासून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे वेळापत्रकसुद्धा कंपनीने जाहीर केले आहे. पूर्वी केवळ गोंदिया-इंदूर विमानसेवा सुरू करण्यात येणार होती. पण स्टार एअर कंपनीने आता गोंदिया-इंदूर-बेंगळुरू या मार्गावर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

गोंदिया-दिल्ली विमानसेवेसाठी बालाघाट ( म.प्र.) च्या खासदारांचा पुढाकार

गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. या दोन्ही राज्यातील प्रवाशांसाठी गोंदिया येथील विमानतळ सोयीस्कर आहे. त्यामुळे गोंदिया-दिल्ली या मार्गावर प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी बालाघाटच्या खा. भारती पारधी यांनी पुढाकार घेत केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले. यावर केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी सुद्धा अनुकूलता दर्शविल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच थेट गोंदियाहून दिल्लीला उड्डाण घेणे शक्य होणार असून यामुळे गोंदिया, बालाघाट ( म.प्र.), राजनांदगाव (छत्तीसगड) या जिल्ह्यातील उद्योगाला चालना मिळण्यास मदत होईल.

 

१६ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या विमानसेवेचे असे आहे वेळापत्रक

बेंगळुरूहून दुपारी २:३० वाजता विमान इंदूरसाठी उड्डाण घेईल व सायंकाळी ४:३० वाजता इंदूरला पोहोचेल. इंदूरहून सायंकाळी ५ वाजता गोंदियासाठी उड्डाण भरेल आणि गोंदियाला सायंकाळी ५:५५ वाजता पोहोचेल. तर गोंदियाहून सायंकाळी ६:२५ वाजता इंदूरसाठी उड्डाण भरेल व सायंकाळी ७:२० याजता इंदूरला पोहोचेल व सायंकाळी ७:५० वाजता बेंगळुरूसाठी उड्डाण भरेल व रात्री ९:४५ वाजता बेंगळुरूला पोहोचेल.

About विश्व भारत

Check Also

विदर्भात पावसामुळे सतर्कतेचा इशारा

हवामान विभागाने एकीकडे राज्यात पावसाला ‘ब्रेक’ लागणार असे सांगितले असले तरीही दुसरीकडे विदर्भात मात्र सतर्कतेचा …

कांद्या सडला : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका हा कांद्याचे कोठार समजला जातो. पण, हे कोठार आता अवकाळी पावसाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *