Breaking News

लिंबू, संत्र्याची चीनमध्ये वाढली अचानक मागणी…वाचा🍋🍊

Advertisements

चीनमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळेच तेथील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहे. औषधांच्या तुटवड्यासह डॉक्टर्स आणि नर्स यांचाही तुटवडा चीनमध्ये जाणवत आहे.

Advertisements

पण दुसरीकडे चीनमधील लोकांनी लिंबू आणि संत्रे खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Advertisements

चीनमध्ये कोरोनाचे नवीन ‘बीएफ 7’ या व्हेरिएंटची घातक लाट आल्यानंतर लिंबूच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकर्‍यांच्या व्यवसायात अचानक वाढ झाली आहे. लिंबूच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. चीनमधील लोक कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी नैसर्गिक उपायांचा वापर करत आहेत. कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारकशक्ती असणे महत्त्वाचे असते. लिंबू किंवा लिंबू वर्गातील संत्री, मोसंबी अशा फळांमध्ये व्हिटॅमिन सी म्हणजेच ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते आणि ते रोगप्रतिकारकशक्ती वाढवते.

वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चीनमध्ये व्हिटॅमिन सी असलेल्या उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढली आहे. त्यामध्ये लिंबूवरच्या स्थानी आहे. चीनमधल्या डिटेन्शन कॅम्पमध्ये औषधांचा तुटवडा असल्याने लोक लिंबू, संत्री मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शांघायमधील एका आरोग्य केंद्राचे रूपांतर डिटेन्शन कॅम्पमध्ये करण्यात आले आहे. येथे कोरोना रुग्णांना ठेवण्यात आले आहे. औषधे त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने ते प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी संत्र्यांवर तुटून पडत आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

वात जोड़ों के दर्द कम करने से लेकर इन्फेक्शन से बचाने तक अजवाइन के अन्य फायदे

वात जोड़ों के दर्द कम करने से लेकर इन्फेक्शन से बचाने तक अजवाइन के अन्य …

महिला विश्व ‘रन फॉर नेशन, रन फॉर मोदी’, भाजपची नारी शक्ती वंदन मॅराथॅान

महिला विश्व ‘रन फॉर नेशन, रन फॉर मोदी’, भाजपची नारी शक्ती वंदन मॅराथॅान टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *