Breaking News

शेताच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून

शेताच्या वाटणीवरून राग अनावर झाल्याने पुतण्याने काकाचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि.२८) दुपारी चंद्रपूरमधील चिमुर येथील गांधीवार्डात घडली. प्रभाकर नागोसे (वय ६०) असे खून झालेल्या काकाचे नाव आहे. तर रूपेश पत्रु नागोसे असे आरोपी पुतण्याचे नाव आहे.

घटना वाचा…👇

चिमुरमधील गांधी वार्डातील रहिवासी असलेले मृतक व आरोपी नात्याने चुलते-पुतने आहेत. मृतक प्रभारक नागोसे यांनी, आपल्या आई-वडीलांचा मरेपर्यंत सांभाळ केला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याचा शेतीचा हिस्सा मृतकाने स्वतःकडे ठेवून घेतला. मृतकास एकही अपत्य नव्हते. तो प्लॉट विक्रीचा व्यवसाय करीता होता. त्या माध्यमातून झालेल्या प्रगतीमधून दोन वर्षापूर्वी त्याने नवीन घराचे बांधकाम केले होते. दिवसेंदिवस होणारी प्रगती ही आरोपी पुतण्या रूपेश नागोसेला सलत होती. त्यामुळे काकाचा तो नेहमी राग करीत होता.

२७ डिसेंबरला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी बट्टीबोरी येथून काकाचा वचवा काढण्याच्या उदेश्याने चिमुर येथील घरी आला. मृतक काका हा घरी नसल्याने त्याने सर्वप्रथम त्याचे पत्नीशी भांडण केले. काही वेळाने मृतक प्रभाकर हा घराकडे येताना दिसला. आरोपीने लाकडी दांड्याने काकाला घरात प्रवेश करण्याच्या आधीच डोक्यावर जबर वार केला. एकाच वारात काकाचा जागीच मृत्यू झाला. मृतकाच्या पत्नीला या घटनेची कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन त्याने घटनास्थळावरील रक्ताचे डाग पाण्याने मिटवून पुरावा नष्ट केला.

दरम्यान रेखा आदम हिने केलेल्या तक्रारीवरुन चिमूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पडून असलेला मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आला. आरोपी पुतण्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरु

About विश्व भारत

Check Also

झोलाछाप डॉक्टर के इंजेक्शन से मचा कोहराम

झोलाछाप डॉक्टर के इंजेक्शन से मचा कोहराम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   सिंगरौली। मध्यप्रदेश …

नागपुरातील दंगलीचे कारण काय? कशामुळे भडकली दंगल?

विश्व हिंदू परिषदेच्या जवळपास ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी दुपारी एक वाजता महाल झेंडा चौकात औरंगजेबाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *