Breaking News

दोन हजार घेताना तलाठी अटकेत

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे सेवानिवृत्त कर्मचारी व इतर दोघांनी मिळून दिघोरी (पोंभुर्णा) येथे शेत विकत घेतले. त्या सामूहिक शेतजमिनीचे फेरफार करीत वेगळा सातबारा व नकाशा दुरुस्ती करायची होती. मात्र, या कामाकरिता घोसरी येथील तलाठी दिलीप रामचंद्र मोरे याने तीन हजार रुपयांची मागणी केली.

पैसे दिल्यास काम तातडीने करून देऊ, अशी हमी तलाठी मोरे यांनी दिली. तडजोडीअंती 2 हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, यापूर्वी फिर्यादी यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली. तक्रारीची पूर्णपणे पडताळणी करीत पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी सापळा रचला.

पोंभुर्णा येथील भाड्याच्या खोलीत मोरे यांनी २ हजार रुपये स्वीकारले. त्यावेळी लाचलुचपत विभागाच्या चमूने तलाठी मोरे यांना अटक केली. आरोपी तलाठी मोरे यांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू आहे.

About विश्व भारत

Check Also

पति के लिए प्यार सिर्फ दिखावा था : दरअसल दौलत से था प्रेम

पति के लिए प्यार सिर्फ दिखावा था : दरअसल दौलत से था प्रेम टेकचंद्र सनोडिया …

सिवनी जिला के आदिवासी वाहुल्य इलाकों में जमकर फल-फूल रहा है अवैध मौहा शराब का कारोबार

  ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री:   सिवनी। मध्यप्रदेश की आध्यात्म नगरी सिवनी जिले के ग्रामीण भागों …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *