चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका परिसर ह्या ठिकाणी भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. ३.२ रिश्टरचे भूकंप नोंद झाल्याची माहिती भूकंप अँप द्वारे प्राप्त झाली. त्याच वेळी वरोरा परिसरातील नागरिक विशेषतः मार्दा, एकोना गावातील नागरिक , पोलीस पाटील , तलाठी त्यांच्यामार्फत खात्री केली. भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे सांगण्यात आले. तसेच सदर परिसरात वेकोली खदान व्यवस्थापनाकडूनही खात्री करण्यात आलेली आहे.
