-
⭕ निलेश राणे आदित्य ठाकरेंवर घसरले ⭕
पुणे : ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )पुणे : कोरोनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक सुरू असताना मोबाईलमध्ये व्यस्त असलेले आदित्य ठाकरे यांना प्रोटोकॉल कळत नाही. त्यांना प्रोटोकॉल कुणीतरी समजावून सांगा, अशी टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. यांना कोणत्याही गोष्टीचे गांभीर्य नाही, बालिश बुद्धीचे आहेत, अशा शब्दांत राणे यांनी ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. आमदार रोहीत पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी दुसरे ट्विट करून आदित्य ठाकरे यांनाही लक्ष केले आहे.
राज्यातील साखर उद्योगासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे केलेली मागणी. त्यावर राणे यांनी केलेले ट्विट. त्याला रोहीत पवार यांनी दिलेले उत्तर आणि त्यावर एकेरीवर येत राणे यांनी पुन्हा दिलेले उत्तर या साऱ्या चर्चात आदित्य ठाकरे यांच्यावरही नीलेश राणे यांनी एकेरीवर येत टीका केली आहे.
Tags Politics
Check Also
अहमदाबाद विमान अपघातासाठी प्रफुल्ल पटेल जबाबदार : नाना पटोलेंचा गंभीर आरोप
तत्कालिन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळात विमानांच्या खरेदीबाबत …
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळच्या आमदाराला राजकारण कळत नाही
महाराष्ट्र : मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे विधान परिषद सदस्य परिणय फुके …