Breaking News

सनी देओल बेपत्ता

विश्व भारत ऑनलाईन :
पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यात प्रसिद्ध अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल हरवला असल्याचे पोस्टर शहरभर लावले आहेत. घरांच्या भिंती, रेल्वे स्थानक आणि वाहनांवर हे पोस्टर्स चिटकवले आहेत.

त्यामुळे शहरभर एकच चर्चा सुरू आहे. भाजप खासदार सनी देओल लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आपल्या मतदारसंघात फिरकलेच नाहीत, त्यामुळे स्थानिक लोकांनी खासदाराविरोधात रोष व्यक्त केला आहे.

सनी देओल हे पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार आहेत. लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर ते लोकांना कधी भेटलेच नाहीत. शिवाय ते कधीही आपल्या मतदारसंघात गेले नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिक संतापले आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये सनी देओलबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे लोक शहरभर सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर लावत आहेत. तसेच संताप व्यक्त करत आहेत.

About विश्व भारत

Check Also

स्लिट ड्रेस में सैक्सी जैकलीन फर्नांडिस का जलवा

स्लिट ड्रेस में सैक्सी जैकलीन फर्नांडिस का जलवा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मुंबई। …

दाऊद इब्राहिम बॉलीवूडला पोसायचा आणि अभिनेत्री…!

दिग्दर्शक महेश भट यांनी दिग्दर्शित केलेला ‘आशिकी’ हा सिनेमा ९० च्या दशकात चाहत्यांच्या पसंतीस पडला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *