Breaking News

मल्टिप्लेक्स चित्रपटाचे तिकीट आता १०० रुपयांत!

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची तुम्हाला आवड असेल तर आनंदाची बातमी आहे. आता मल्टिप्लेक्स सिनेमा हॉलचे तिकीट फक्त 100 रुपयांमध्ये मिळू शकते. बॉलीवूड चित्रपटांच्या सततच्या अपयशाने यंदा थिएटर मालक, चित्रपट निर्माते आणि वितरकांची चिंता वाढली आहे. यंदा चित्रपट फ्लॉप झाल्याने मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी सिनेमागृहाकडे पाठ फिरवल्याने थिएटर चालक आता स्वस्त तिकीट देण्याचा विचार करीत आहेत.

Advertisements

गेल्या महिन्यात, राष्ट्रीय सिनेमा दिनी, तिकिटाची किंमत 75 रुपये असताना 60 लाखांहून अधिक लोक सिनेमागृहात पोहोचले. त्यामुळे आता स्वस्तात चित्रपटाची तिकिटे देण्याचे नियोजन सुरू आहे. चित्रपट विश्लेषकांचे म्हणणे आहे, की मल्टिप्लेक्समध्ये सिनेमाच्या तिकिटांची किंमत आता 350-450 रुपये किंवा त्याहून अधिक आहे, जे शोच्या वेळा आणि इतर घटकांवर अवलंबून असून सामान्य ग्राहकांसाठी इतकी महाग तिकिटे खरेदी करणे खूप कठीण आहे.

Advertisements

आगामी चित्रपटांसाठी तिकिटे स्वस्त

थिएटर ऑपरेटर आणि वितरक आगामी चित्रपटांसाठी कमी आणि मध्यम बजेट चित्रपटाची तिकिटे स्वस्त करू शकतात. तसेच संध्याकाळ आणि रात्रीच्या शोची तिकिटे माफक दरात उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्याच वेळी, बहुतेक तरुणांना आकर्षित करण्यासाठी, वीकेंडला देखील अशा ऑफर देण्याची योजना आहे.

स्नॅक्सची किंमतही कमी होणार

सिनेमागृहांमधील महागड्या स्नॅक्सबाबत ग्राहकांच्या तक्रारींनंतर खाद्यपदार्थ आणि पेयांच्या किमतीतही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे . प्रयोग म्हणून गेल्या आठवड्यात ब्रह्मास्त्र आणि चुप या चित्रपटांची तिकिटे १०० रुपयांना विकली गेली. आता अजय देवगणचा ‘दृश्यम’ हा चित्रपट २ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे आणि त्यासाठी २ ऑक्टोबरपासून ओपनिंग डे तिकिटांवर ५० टक्के सूट देण्यात आली आहे. अमिताभ बच्चन स्टारर गुडबाय हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाला 150 रुपयांचे तिकीट मिळत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कोट्यवधीची मालकीन असलेली अभिनेत्री रानी चटर्जी चुलीवर बनवते स्वयंपाक

आता नुकताच रानी चटर्जी हिने शेअर केलेला एक व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. रानी …

शबाना आजमी ने जावेद अख्तर से की थी ‘ब्रेकअप’ की कोशिश

शबाना आजमी की लाइफ के कई ऐसे किस्से हैं, जिनके बारे में ज्यादातर लोग नहीं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *