Breaking News

‘ब्लड प्रेशर’मध्ये ‘चालणे’ किती महत्वाचे?

Advertisements

धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट ठेवण्यासाठी तासन् तास जिममध्ये घाम गाळणे प्रत्येकालाच शक्य नसते. अशा वेळी ‘चालणे’ हा सर्वांत सोपा, विनामूल्य आणि प्रभावी व्यायाम मानला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का? केवळ ३० मिनिटांचे चालणे तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यासोबतच मानसिक तणावही दूर करू शकते. शरीराची ऊर्जा वाढवण्यापासून ते गंभीर आजारांना दूर ठेवण्यापर्यंत चालण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे रक्तदाबदेखील नियंत्रणात ठेवता येतो. पण, त्यासाठी रोज किती चालणे गरजेचे आहे ते जाणून घेऊ…

Advertisements

 

क्वोरा (Quora) वरील एका प्रश्नाला उत्तर देताना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसिन डायरेक्टर डॉ. अमित सराफ यांनी सांगितले, “फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही अत्यंत कठीण व्यायामाची गरज नाही. बहुतेक प्रौढ व्यक्तींसाठी आठवड्यातून किमान पाच दिवस ३० मिनिटे वेगाने चालणे (Brisk Walking) पुरेसे आहे. त्यामुळे आठवड्याला १५० मिनिटांचा व्यायाम होतो, जो हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक मानला जातो.

Advertisements

 

वेगापेक्षा सातत्य महत्त्वाचे

चालताना तुमच्या वेगापेक्षा सातत्य आणि तीव्रता अधिक महत्त्वाची असते. ‘ब्रिस्क वॉकिंग’ म्हणजे इतक्या वेगाने चालणे ज्यामध्ये तुमच्या हृदयाचे ठोके आणि श्वास घेण्याचा वेग किंचित वाढतो, पण तुम्ही कोणाशीही सहज संवाद साधू शकता. डॉ. सराफ पुढे म्हणतात, “जर तुम्हाला सलग ३० मिनिटे चालणे कठीण वाटत असेल, तर तुम्ही दिवसातून १० ते १५ मिनिटांचे दोन-तीन टप्पे करू शकता. नियमितपणे केल्यास हे छोटे टप्पेदेखील तितकेच प्रभावी ठरतात.

 

ज्यांचा रक्तदाब आधीच वाढलेला आहे, अशा लोकांसाठी हालचाल वाढवणे खूप फायदेशीर ठरते. अभ्यासानुसार, नियमित चालण्यामुळे सिस्टोलिक (Systolic) रक्तदाब ४ ते ९ mmHg पर्यंत कमी होऊ शकतो. कालांतराने, यामुळे रक्ताभिसरण सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि तणाव कमी होतो. या सर्व गोष्टी रक्तदाब व्यवस्थापनासाठी पूरक आहेत.

 

स्वत:ला ‘या’ छोट्या सवयी लावा.

लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा.

 

जेवणानंतर थोडा वेळ चाला.

 

संध्याकाळी मोकळ्या हवेत फेरफटका मारा.

 

निसर्गाच्या सान्निध्यात चालल्याने तणाव कमी होण्यास मदत होते.

 

सुरुवात हळूहळू करा

सुरुवात करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एकदम जड व्यायाम सुरू करण्यापेक्षा हळूहळू वेळ आणि वेग वाढवणे केव्हाही सुरक्षित आणि प्रभावी ठरते. ज्यांना उच्च रक्तदाबाचा गंभीर त्रास आहे किंवा हृदयाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी नवीन व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

 

थोडक्यात सांगायचे तर, सातत्य राखून मध्यम वेगाने चालणे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. दीर्घकालीन आरोग्यासाठी ही सर्वांत सोपी आणि अवलंबण्यासारखी सवय आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अभिमंत्रित जैतून या तिल की तेल मालिश के आलौकिक फायदे

अभिमंत्रित जैतून या तिल की तेल मालिश के आलौकिक फायदे टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

मंत्रोच्चार करत ऑलिव्ह ऑइल मसाज करण्याचे आश्चर्यकारक फायदे

मंत्रोच्चार करत ऑलिव्ह ऑइल मसाज करण्याचे आश्चर्यकारक फायदे टेकचंद्र सनोडिया शास्त्री: ९८२२५५०२२०   आयुर्वेद, कामसूत्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *