Breaking News

वाळू तस्करी : तर तलाठी,मंडळ अधिकारी, तहसीलदार निलंबित

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
राज्यातील बऱ्याच भागात वाळूचोरी मोठ्या प्रमाणावर होत असते. लिलाव बंद असताना नियमबाह्य वाळूची चोरी होत आहे.

Advertisements

हा प्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे सुतोवाच मंत्री विखे-पाटील यांनी केले. ज्या भागातून वाळू चोरी केली जाते,त्या भागातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना त्वरित निलंबित करण्याच्या सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. सध्या राज्यातील सर्वच जिल्ह्यात वाळू माफियांनी थैमान घातले आहे. यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे.

Advertisements

वाळूचोरीमुळे शासनाचा महसूल बुडत आहे. त्यामुळे राज्यात सर्वच जिल्ह्यांत होणारी वाळू चोरी रोखण्यासाठी लवकरच राज्य सरकार वाळूविषयी नवे धोरण राबवणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. या वेळी पंढरपूर येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

6 तहसीलदार निलंबित

शासनाने आदेश देऊनही मागील अडीच महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात रुजू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या तीन तहसीलदारांना शासनाने …

‘पीडब्लूडी’चे संजय उपाध्ये, प्रशांत वसुले यांचा पुरस्काराने गौरव : मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या अभियंत्यांना राज्य शासनातर्फे पुरस्कार घोषित करण्यात आला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *