Breaking News

रेतीच्या ट्रॅक्टरने कोतवालास चिरडले : घटनास्थळीच…!

Advertisements

रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या चालकास अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महसूल विभागाच्या कोतवालास ट्रॅक्टरने चिरडले. या कोतवालाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Advertisements

 

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील कोलद वान नदीपुलाजवळ ही घटना घडली. अवैध रेतीची वाहतुक केली जात असल्याच्या माहिती वरुन महसुल कर्मचारी कोलद वाननदी पुलावर दाखल झाले. कोतवाल लक्ष्मण भिकाजी अस्वार यांनी अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रक्टरला थांबविण्याचा प्रयत्न केला. चालकाने वाहन न थांबविता कोतवाल लक्ष्मण भिकाजी अस्वार (राहणार एकलारा बानोदा, तालुका संग्रामपूर) रेतीने भरलेला ट्रक्टर त्यांच्या अंगावरून नेला. त्यामुळे कोतवाल अस्वार गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Advertisements

 

खळद येथील आरोपी चालक संतोष पारिसे विरूध्द तामगाव पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असल्याची माहिती पोलीसांनी दिली. फिर्यादी देवेंन्द्र श्रीकृष्ण बोडखे यांच्या फिर्यादी वरून आरोपी संतोष पारिसे विरुद्ध खाण व खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेन्द्र पवार यांच्या मार्गदर्शनात तपास विलास बोपटे करित आहे

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मुुझे तो गोरा लडका चाहिये?मै इस काले दु्ल्हे से नहीं कर सकती शादी : दुल्हन ने लौटाई बारात

मुुझे तो गोरा लडका चाहिये?मै इस काले दु्ल्हे से नहीं कर सकती शादी : दुल्हन …

मिस्टर नटवरलाल! नौकरी दिलाने का नाम पर करोड़ों रुपए की ठगी करने वाला गिरफ्तार

मिस्टर नटवरलाल! नौकरी दिलाने का नाम पर करोड़ों रुपए की ठगी करने वाला गिरफ्तार टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *