Breaking News

महाराष्ट्रासाठी एक्झिट पोलचा अंदाज?

महाराष्ट्रासाठी पोल डायरीचा एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो आहे? महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक संपली आहे. आता पोल डायरीने जो अंदाज वर्तवला आहे त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल. १२२ ते १८६ जागा महायुती जिंकेल असा विश्वास पोल डायरीने वर्तवला आहे. महाविकास आघाडीला १२१ जागा मिळतील असा त्यांचा अंदाज आहे. महायुतीला १४५ ते १५५ जागा काय सांगतोय न्यूज एक्सचा पोल? महायुतीला १४५ ते …

Read More »

नागपुरात ईव्हीएम बंद : मतदारांची दमछाक

मध्य नागपुरातील नाईक तलाव परिसरात दोन मतदान केंद्रात काही ईव्हीएम यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे रांगेत लागल्यावरही मतदान होत नसल्याने बरेच मतदान आल्या पावली परतले.   मध्य नागपूर मतदान केंद्रातील नाईक तलावाजवळील संत कबीर प्राथमिक शाळा केंद्रातील खोली क्रमांक २, ३, ४ येथील ईव्हीएम बंद असल्याची मतदारांची तक्रार आहे. तर या परिसरातील महात्मा फुले शाळेतीलही एक ईव्हीएम बंद होती. यंत्रात …

Read More »

अनिल देशमुख यांच्यावर कोणी केला हल्ला? मोठा दावा

विधानसभेचा प्रचार थंडावल्यानंतर काल नागपूरमध्ये राज्याच्ये माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर अज्ञात लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली. या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधकांनी यासाठी सरकारला जबाबदार धरले आहे. या हल्ल्यानंतर नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी माहिती देताना सांगितले की, सोमवारी रात्री ८ …

Read More »

नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला

राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे या भागात जाणवू लागलेली थंडी नाहीशी झाली आहे. दरम्यान, रविवारपासून राज्यात पुन्हा एकदा थंडी जाणवू लागेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. विदर्भात मात्र गेल्या तीन दिवसांपासून गुलाबी थंडी नाहीशी होऊन हुडहुडी भरवणारी थंडी आधीच जाणवू लागली …

Read More »

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या!

‘उद्धव ठाकरे यांच्याआधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना प्रत्येक गोष्टीचे भांडवल करण्याची सवय असते. अधिकाऱ्यांचा अपमान करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिलेला नाही,’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर आज टीकास्त्र सोडले.   मूर्तिजापूर येथे प्रचार सभेसाठी आले असता देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस शब्दात समाचार …

Read More »

निवडणुकीत पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची आयोगाकडून बदली

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या १५ दिवस आधी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याच आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातले आदेश जारी केले असून त्यांना तातडीने पदरचनेतील त्यांच्यानंतरच्या सर्वात वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार सोपवण्याचे आदेश देण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत. यानंतर मुख्य सचिवांनीदेखील तीन वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पॅनला नव्या पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया …

Read More »

शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार : मोठी बातमी

मागील विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष सत्तास्थापनेसाठी आघाडीमध्ये आले. त्यानंतर दोन पक्षांचे दोन तुकडे झालेले पाहायला मिळाले. जे कालपर्यंत विरोधी पक्षनेते होते, ते मंत्री झालेले पाहायला मिळाले. या सर्व पार्श्वभूमीनंतर आता २०२४ च्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकानंतरही कोणता पक्ष कुठे असेल? हे सांगता येत नाही, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित …

Read More »

नागपूर : ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

विधानसभा निवडणूक रंगात येत आहे. त्यात आयाराम-गयाराम सर्वच पक्षात सुरु आहे. मात्र, नागपूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात गोडबोले यांनी राजीनामा दिल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. देवेंद्र गोडबोले जुने निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांच्या पत्नीही जिल्हा परिषद सदस्य होत्या. ते रामटेक …

Read More »

शाकाहारी थाळी ७०, मांसाहारी थाळी १२०, पोहे, शिरा, उपमा १५, तर चहा ८ रुपये : निवडणूक

निवडणूक आचारसंहितेत खाण्यावरही आयोगाची करडी नजर असणार आहे. शाकाहारी थाळी ७०, मांसाहारी थाळी १२०, पोहे, शिरा, उपमा १५, तर चहा ८ रुपये हे आहेत विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना ठरवून दिलेले दरपत्रक. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रचार खर्चासाठी अशा एकूण २५२ वस्तूंची दरसुची जाहीर केली असून ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त खर्च केल्यास आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल उमेदवारांवर कारवाईचा इशारा दिला आहे.   विधानसभेसाठी …

Read More »

कामठी, गोंदिया, अकोला, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर, धामणगाव,चंद्रपूर, आर्वी मधील मतदार यादीत घोळ : काँग्रेसचा आरोप

शिर्डी, चंद्रपूर, आर्वी, कामठी, कोथरूड, गोंदिया, अकोला ईस्ट, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर, धामणगाव या मतदारसंघांतील नावे वगळण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.   महाराष्ट्रातील मतदारांची नावे वगळून छत्तीसगड, मध्य प्रदेशसह बाहेरच्या राज्यातील मतदारांची नावे त्यामध्ये टाकून दहा हजार नावे त्यामध्ये जोडली जात आहेत. हे भाजपचे कारस्थान असून त्यात राज्यातील काही अधिकारी सहभागी असल्याचा आरोप, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज …

Read More »