आपल्याला धनवान बनायचं आहे तर आपल्याला धनवान लोकांसोबत राहायला पाहिजे. असं करून आपण त्यांच्यासारखा विचार करायला आणि त्यांच्यासारखं काम करायला लागतो आणि होऊ शकते,की आपणही धनवान होऊ.आपल्याला धावपटू बनायचं आहे तर आपल्याला धावपटूसोबत राहायला पाहिजे.अशाप्रकारे आपण त्यांच्यासारखे जीवन जगायला प्रेरित होऊ. आपण बघू,की त्यानंतर आपण जास्त कसरत करत आहोत,स्वत:ला बलशाली करत आहोत,आहारावर जास्त लक्ष देत आहोत आणि धावण्याचा प्रयास करत …
Read More »मेकअप : फाउंडेशन असे करावे
मेकअपकडे एक कला म्हणून बघितले जाते. काही महिला आॅफिसला जातानाही हलकासा मेकअप करणे पसंत करतात. काही वेळा ही व्यवसायाची अथवा कामाची गरज असते. प्रत्येक वेळी ब्युटीपार्लरमध्ये धडक देत मेकअप करवून घेणे शक्य नसते. त्यामुळे मेकअपची काही सोपी तंत्रे शिकून घेतल्यास सोयीचे ठरू शकते. साधारणपणे फाउंडेशनचा विचार करता यात तीन प्रकार आढळून येतात. लिक्विड, क्रिम आणि पावडर. फाउंडेशनच्या वापरासाठी मऊ स्पंजचा …
Read More »कोरोना आणि वसुंधरा
चीन देशातून पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे़ अनेकांना त्याची लागण झाली असून, हजारोंना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहेत. जगातील बोटावर मोजण्याइतपत देश त्यापासून मुक्त राहिले आहेत़ अनेक देशांत ‘लॉकडाऊन’(टाळेबंदी) करण्यात आली आहे़ महत्त्वाचे उद्योगधंदे, कारखाने, कंपनी बंद ठेवण्यात आल्या आहेत़ सर्वसामान्य नागरिकांसह कामगारांना, मजुरांना, शासकीय कर्मचाºयांना (अत्यावश्यक सेवा वगळता) घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे़ …
Read More »बघा बालवैज्ञानिक हिमांशूने काय बनवले…
नागपूर, २१ मे बालवैज्ञानिक हिमांशू राजेंद्र चौरागडे याने आपल्या कल्पकतेने सेन्सर डिव्हाईस तयार केले असून, हिंगणा एमआयडीसीतील एका कंपनीकडून कॉंन्टॅक्ट-लेस हँड सॅनिटाईझर मशिनमध्ये त्याचा वापर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कंपनीसह अन्य एका उद्योगाकडून सुमारे दोन हजार डिव्हाईस तयार करण्याची संधीही मिळाली आहे. सरस्वती विद्यालयातील इयत्ता आठवीतील हिमांशूने लहान वयातच मोठे यश गाठल्याने त्याचे कौतुक होत आहे. राजेंद्र चौरागडे …
Read More »सौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास महावितरण मोफत बदलून देणार
नागपूर : महावितरणकडून राज्यभरात कार्यान्वित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील तीन किंवा पाच एचपी क्षमतेचे सौर कृषिपंप तांत्रिक बिघाडासह वादळी पाऊस, गारपिट किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नादुरुस्त झाल्यास ते पूर्णपणे मोफत दुरुस्त करून किंवा बदलून देण्यात येणार आहे. सध्या राज्यात वादळी पाऊस व गारपिटीचा धोका आहे. अनेक ठिकाणी वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला आहे. यामध्ये सौर कृषिपंप किंवा …
Read More »