नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरांत सतत वाढ होत आहे. आज सलग 16 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. कोरोनामुळे देश आर्थिक संकटात असताना दररोज वाढणारे इंधनाचे दर सामन्यांच्या खिशाला कात्री लावत आहे. आज पुन्हा एकदा तेल वितरक कंपन्यांनी इंधनाच्या दरांत वाढ केली आहे. सोमवारी पेट्रोल किंमतीत 0.33 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलचे दर 0.58 पैशांनी वाढले आहेत.
दिल्लीत पेट्रोलचा भाव 79.56 रुपये प्रतिलीटर, तर डिझेलचा दर 78.85 रुपये प्रतिलीटरवर पोहचला आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीत दिवसागणिक घट होत आहे. तरी देखील इंधनाच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर अन्य शहरांच्या तुलनेत जास्त आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर एसएमएसच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन आॅईलचे ग्राहक आरएसपी लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. बीपीसीएलचे ग्राहक फरढ लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक एचपीप्राईस लिहून 9222201122 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.
दरम्यान, दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.
Check Also
नागपुरातील बारूद कंपनीत स्फाेट : कामगारांचा जागीच मृत्यू
नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज …
१२ भाविकांचा मृत्यू : मौनी अमावस्येला महाकुंभात चेंगराचेंगरी : शाही स्नान रद्द
महाकुंभ येथील संगम घाटावर बुधवारी पहाटे संगम येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या पवित्र सोहळ्याला …