मेकअप : फाउंडेशन असे करावे

मेकअपकडे एक कला म्हणून बघितले जाते. काही महिला आॅफिसला जातानाही हलकासा मेकअप करणे पसंत करतात. काही वेळा ही व्यवसायाची अथवा कामाची गरज असते. प्रत्येक वेळी ब्युटीपार्लरमध्ये धडक देत मेकअप करवून घेणे शक्य नसते. त्यामुळे मेकअपची काही सोपी तंत्रे शिकून घेतल्यास सोयीचे ठरू शकते.
साधारणपणे फाउंडेशनचा विचार करता यात तीन प्रकार आढळून येतात. लिक्विड, क्रिम आणि पावडर. फाउंडेशनच्या वापरासाठी मऊ स्पंजचा वापर प्रामुख्याने करावा. चेहºयावर फाउंडेशन लाऊन हलक्या हाताने स्पंज फिरवावा. मानेवरही फाउंडेशन लावावे. कारण त्याला मेकअपचा बेस मानले जाते. त्याने चेहºयावरील छोटे डाग, खड्डे, काही वर्तुळे झाकली जातात. त्यामुळे फाउंडेशन एकसारखे पसरणे महत्त्वाचे आहे, अन्यथा त्याचे लेअर्स स्पष्ट दिसून येतात आणि मेकअप पॅची दिसतो.
यात काही काळजी घेणे गरजेचे आहे़ त्वचेचा पोत लक्षात घेऊन फाउंडेशनचा प्रकार निवडावा. मेकअप करताना डोळ्यांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. प्रथमदर्शनी डोळ्यांकडेच लक्ष जाते. त्यामुळे येथील छोटीशी चूकही सगळा मेकअप बिघडवून टाकते. यासाठी शक्यतो वॉटरप्रूफ लाँग लास्टिंग मेकअप साहित्य वापरावे. मेकअपची सुरुवात आय शॅडो लाऊन करावी. त्यानंतर आय लायनर लावावा. पापण्यांवर हलक्या प्रमाणात ब्राँझ शेड वापरल्यास डोळे उठावदार दिसतात. त्यानंतर मस्करा वापरावा. प्रथम वरच्या आणि नंतर खालच्या पापणीला मस्करा लावावा. गालावर मेकअपचा हात फिरवताना तोच रंग जबड्यापाशी आणि गालाच्या कडांवर लावावा. यासाठी वार्म ब्रश वापरणे चांगले. डार्क ब्रशने त्वचा कोरडी होण्याचा धोका असतो. नेहमी ब्राईट, ग्लासी कलर वापरावेत. यामुळे मेकओव्हरचा आनंद मिळवता येतो. मेकअप करण्याएवढेच लक्ष मेकअप उतरवण्याकडे द्यावे. न कंटाळता मेकअप धुणे आणि त्वचेवर ओलावा देणारे क्रिम लावणे महत्त्वाचे आहे. मेकअप अधिक काळ त्वचेवर राहिल्यास नुकसान होण्याची शक्यता असते, हेही लक्षात ठेवावे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला

राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या!

‘उद्धव ठाकरे यांच्याआधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *