Breaking News

केंद्राची ‘ती’ घोषणा अर्थसंकल्पीय योजनांचा भाग : पाटील

Advertisements

मुंबई, २१ मे
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील बहुतांश घोषणा अर्थसंकल्पीय योजनांचा भाग आहे, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते.
कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकार आर्थिक पॅकेज का जाहीर करत नाही, या विरोधकांच्या प्रश्नाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी राज्य सरकारला जाब विचारणाºया राज्यातील भाजप नेत्यांना केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीचा दाखला दिला.
केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. या पॅकेजमुळे जनतेला दिलासा मिळायला पाहिजे होता. मात्र, प्रत्यक्षात तसे दिसत नाही. कारण, या पॅकेजमधील बहुतांश घोषणा अर्थसंकल्पीय योजनांचा भाग आहेत, तर बाकी रक्कम ही कर्जाच्या स्वरुपात दिली जाणार आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याची थकित रक्कम देण्याची मागणीही केली.
केंद्र सरकारकडून एप्रिल महिन्यात राज्याला २८०० कोटी मिळाले. यानंतर मे महिन्यात पैसेच आले नाहीत. डिसेंबर ते मार्च या काळातील ५१०० कोटी रुपयांची जीएसटी थकबाकी केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांनी सरकार आर्थिक पॅकेज का जाहीर करत नाही, असे विचारून बुद्धिभेद करू नये, असा टोलाही मंत्र्यांनी लगावला.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

मंत्री बावनकुळे करणार १५२ महसूल अधिकाऱ्यांना निलंबित

जमिनीच्या नोंदींमध्ये बेकायदेशीरपणे बदल केल्याप्रकरणी तब्बल १५२ महसूल अधिकाऱ्यांवर राज्य सरकारकडून मोठी कारवाई केली जाणार …

तीन IAS अधिकाऱ्यांनी घेतली भोंदू अशोक खरातची भेट : उपजिल्हाधिकारी गोत्यात

तीन IAS अधिकाऱ्यांनी घेतली भोंदू अशोक खरातची भेट भोंदू अशोक खरातच्या अटकेच्या अवघ्या तीन दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *