न्यू यॉर्क, २१ मे
संपूर्ण जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेवर आता नैसर्गिक संकट कोसळले आहे. अमेरिकेच्या मध्य भागातील मिशिगन राज्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील एडनविले आणि सॅनफोर्ड ही दोन धरणे फुटली आहे. सुमारे १० हजार लोकांना उंच ठिकाणी हलवण्यात आले आहे. दरम्यान, मिशिगनचे राज्यपाल ग्रेटचेन व्हाइटमर यांनी राज्यामध्ये आणीबाणीची घोषणा केली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने वृत्त दिले आहे.
राष्ट्रीय हवामान संस्था (नॅशनल वेदर सर्व्हिस-एनडब्ल्यूएस) विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मिशिगनमधील मिडलँड भागातील टिट्टाबावासी नदी आणि स्टर्लिंगजवळील रायफल नद्या दुथडी वाहत आहेत. या नद्यांना मोठा पूर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मंगळवारी टिट्टाबावासी नदीतील पाण्याची पातळी ३०.५ फूट इतकी होती. हीच पातळी बुधवारी ३८ फुटांपर्यंत वाढत गेल्याने आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे एडनविले आणि सॅनफोर्ड धरणे फुटली. सुदैवाने धरणफुटी आणि जोरदार पावसामुळे अद्याप कोणाचाही मृत्यू झालेला नाही, असे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
पुढील काही तासांमध्ये मिशिगनमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून मिडलँड सखल भागांमध्ये नऊ फुटांपर्यंत पाणी साचण्याची भीती आहे, असे राज्यपालांनी बुधवारी रात्री स्पष्ट केले होते. या भागामधील साडेतीन हजार घरांमध्ये वास्तव्यास असलेल्या १० हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्याचे मिडलँड कंट्री बोर्ड कमिशनचे अध्यक्ष मार्क बोन यांनी सांगितले़
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिशिगनमध्ये मदतकार्य सुरू असल्याने फिझिकल डिस्टन्सिंग (शारीरिक दूरता) नियमांचे पालन करत बचावकार्य करण्यावर मर्यादा येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Check Also
पाक के खिलाफ बड़ी कार्रवाई के लिए तीनों भारतीय सेना प्रमुख एक जुट
पाक के खिलाफ बड़ी कार्रवाई के लिए तीनों भारतीय सेना प्रमुख एक जुट टेकचंद्र सनोडिया …
3 दुश्मन देश पाकिस्तान के साथ : युद्ध की स्थिति में समर्थन देने का ऐलान
3 दुश्मन देश पाकिस्तान के साथ : युद्ध की स्थिति में समर्थन देने का ऐलान …