नागपूर, २१ मे
बालवैज्ञानिक हिमांशू राजेंद्र चौरागडे याने आपल्या कल्पकतेने सेन्सर डिव्हाईस तयार केले असून, हिंगणा एमआयडीसीतील एका कंपनीकडून कॉंन्टॅक्ट-लेस हँड सॅनिटाईझर मशिनमध्ये त्याचा वापर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कंपनीसह अन्य एका उद्योगाकडून सुमारे दोन हजार डिव्हाईस तयार करण्याची संधीही मिळाली आहे. सरस्वती विद्यालयातील इयत्ता आठवीतील हिमांशूने लहान वयातच मोठे यश गाठल्याने त्याचे कौतुक होत आहे.
राजेंद्र चौरागडे यांचा एक मित्र नोकरी करत असलेल्या कंपनीला काँटॅक्ट-लेस हँड सॅनिटाईझर मशिन बनवायची होती. त्यावर मोठा खर्च होऊनही यश न आल्याने या मित्राला हिमांशूबद्दल माहिती मिळाली. यानंतर त्याच्या पुढ्यात मोठी संधी चालून आली. सध्या कोरोना लॉकडाऊन असल्याने वडिलांच्या मित्रानेच काही सामान उपलब्ध करून दिले़ त्याने संगणकावर पीसीबी सर्किट डिझाईन केले. त्याला असेम्बल करून कंपनीला सायंकाळपर्यंत डिव्हाईस बनवून दिले. दुसºया दिवशी ते सर्किट कॉंन्टॅक्ट-लेस हँड सॅनिटायझर मशिनमध्ये फिट केले आणि आश्चर्य म्हणजे हिमांशूने बनवलेले मॉडेल काम करू लागले. यावर कंपनीचे मालक फार खूष झाले. त्यांनी हिमांशूसोबत संपर्क करत सुमारे १० मिनिटे चर्चा केली. विशेष म्हणजे आता कंपनीतर्फे त्याला सुरुवातीला १५ सेंसर सर्किट निर्माण करण्याची आॅर्डर मिळाली. कंपनी हे उपकरण त्यांच्या विविध मॉडेलमध्ये वापरत आहे. याशिवाय अन्य एका कंपनीकडून सुमारे दोन हजार डिव्हाईस तयार करण्याचे काम मिळाले आहे.
हिमांशूला ईलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स तसेच आर्टिफिशिअल इन्टेलिजन्समध्ये संशोधनाची मागील चार वर्षांपासून आवड आहे. व्हीएनआयटी कॉलेजमध्ये प्रयास ग्रूपद्वारा आयोजित विज्ञान प्रदर्शनीत सहभाग घेतल्यावर एक नवी आवड निर्माण झाली. वेगवेगळे यू ट्यूब चॅनेलवरील संशोधनात्मक बाबींचे अवलोकन करून तो विविध ईलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट तयार असतो़ यासाठी त्याने आपल्या घरी प्रयोगशाळासारखी व्यवस्थाही केली आहे.
दरम्यान, मागील वर्षी आणि यंदाही व्हीएनआयटी कॉलेजमध्ये आयोजित स्मार्ट होम आॅटोमोशनमध्ये हिमांशूने दोनवेळा पहिले बक्षीस पटकावले आहे. सुभाषनगरातील कामगार कॉलनी येथील सीएससी सेंटरवरून त्याने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा एक महिन्याचा आॅनलाईन अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.
Check Also
नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला
राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या!
‘उद्धव ठाकरे यांच्याआधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना …