नवी दिल्ली,२१ मे
आपण देशभक्ताचे पुत्र असल्याचा आपल्याला अभिमान आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्यांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.
माझे वडील खरे देशभक्त, उदारमतवादी आणि परोपकारी होते. अशा वडिलांचा पुत्र असल्याचा मला अभिमान आहे. पंतप्रधान असताना त्यांनी देशाला विकासाच्या दिशेने नेले. त्यांच्या दूरदृष्टीने त्यांनी महत्त्वाची पावले उचलत देशाचे सक्षमीकरण केले. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना प्रेम आणि कृतज्ञतेने अभिवादन करतो, असे राहुल गांधी म्हणाले.
तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी १९८४ मध्ये काँग्रेस पक्षाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. वयाच्या ४० व्या वर्षी ते भारताचे सर्वात लहान वयातील पंतप्रधान बनले. २० आॅगस्ट १९४४ रोजी जन्मलेले राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी त्यांची तामिळनाडूतील श्रीपेरुंबुद्दूर येथे एका निवडणुकीच्या सभेदरम्यान एलटीटीई संघटनेने आत्मघाती हल्ला करत त्यांची हत्या केली होती.
Check Also
खासदार-आमदारांसाठी चांदीच्या थाळीत भोजन
संसद तसेच विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष व सदस्यांसाठी चक्क चांदीच्या थाळीतून पंचपक्वान्नचा बेत करण्यात आला …
देश मे 60 लाख असंगठित श्रमिकों को सहायता मिलने की उम्मीद
देश मे 60 लाख असंगठित श्रमिकों को सहायता मिलने की उम्मीद टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …