Breaking News

महाकुंभमेळ्यात एकापाठोपाठ तीन स्फोट

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभमेळ्याला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. या आगीचे लोट दूरहून दिसत आहेत.

प्राथमिक अहवालानुसार, कॅम्प साइटवर आग लागली आणि त्या भागात बसवलेल्या अनेक तंबूंना या आगीने वेढले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

उत्तर प्रदेशचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रमोद शर्मा इंडियन एक्स्प्रेसला म्हणाले, महाकुंभमध्ये सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली आहे. तर, प्रयागराज झोनचे एडीजी भानू भास्कर इंडिया टुडेला म्हणाले, महाकुंभमेळ्याच्या सेक्टर १९ मध्ये दोन-तीन सिलिंडरचा स्फोट झला. त्यामुळे कॅम्पमध्ये मोठी आग लागली. आगीवर नियंत्रण मिळण्यात आले आहे. सर्व लोक सुरक्षित आहेत आणि कोणीही जखमी झालेले नाही.

“महाकुंभमेळ्याच्या सेक्टर १९ मध्ये दोन सिलिंडरचा स्फोट होऊन शिबिरांमध्ये मोठी आग लागली. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत”, असे आखाडा पोलिस स्टेशनचे प्रभारी भास्कर मिश्रा यांनी सांगितले.

महाकुंभ २०२५ च्या अधिकृत X हँडलने पोस्ट केले, “खूप दुःखद! महाकुंभला लागलेल्या आगीच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रशासन तात्काळ मदत आणि बचाव कार्य करत आहे. आम्ही सर्वांच्या सुरक्षिततेसाठी माँ गंगाकडे प्रार्थना करतो.

About विश्व भारत

Check Also

नागपूर ते सिंगापूर, बँकॉक आणि क्वालालंपूर थेट विमानसेवा सुरु होणार!

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांना नागपूरहून सिंगापूर, बँकॉक आणि क्वालालंपूर या …

RSS स्वयंसेवकों ने निकाला जयपुर में पथ संचलन

RSS स्वयंसेवकों ने निकाला जयपुर में पथ संचलन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट जयपुर, 30 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *