Breaking News
Oplus_131072

नागपुरातील बारूद कंपनीत स्‍फाेट : कामगारांचा जागीच मृत्‍यू

नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज (रविवार) मोठा स्फोट झाला.

प्राथमिक माहितीनुसार दोन कामगारांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाल्याची माहिती असून जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह पोलिस, अग्निशमन, रुग्णवाहिका, फॉरेन्सिकचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.

या स्‍फोटाची तीव्रता इतकी होती की या स्फोटाचे हादरे परिसरात अनेक किलोमीटर अंतरावर बसल्‍याची माहिती स्‍थानिक नागरिकांनी दिली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने परिसरातील जंगलातसुद्धा मोठ्या प्रमाणात आग लागली असून अनेक कामगार मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती पसरताच आजुबाजूच्या गावातून लोकांनी गर्दी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सलील देशमुख देखील काही वेळातच घटनास्थळासाठी पोहोचले. फटाक्यात लागणारी बारूद या ठिकाणी तयार होत असल्याची माहिती आहे.

About विश्व भारत

Check Also

नागपुरात घराच्या किंमती रोज का वाढतात? वाढीचा फटका सामान्यांना

राज्यात १ एप्रिलपासून नवे वार्षिक मूल्यदर तक्ते (रेडी रेकनर) लागू झाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत राज्यातील …

नागपूर ते सिंगापूर, बँकॉक आणि क्वालालंपूर थेट विमानसेवा सुरु होणार!

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांना नागपूरहून सिंगापूर, बँकॉक आणि क्वालालंपूर या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *