नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात आज शुक्रवारी सकाळपासून ढगफुटी सारखा पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान झाले असून काहींच्या घराची मोडतोड झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही पावसाने कहर केला आहे. काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झालेला आहे. सप्टेंबर मध्ये आणखी पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस असमाधानकारक आहे. औरंगाबाद मधील सर्वच गावातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस कमी झाल्यास रब्बी पिकांना फटका बसू शकतो. तर, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते.
