मोहन कारेमोरे
मुंबई : सेनेपाठोपाठ आता काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एक गट भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे या साऱ्या शंका-कुशंकांमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचे वृत्त आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे 2 माजी मंत्री शपथ घेऊ शकतात. यातील एक जण राज्याचा मुख्यमंंत्री राहिलेला आहे. तर, एक जण माजी मंत्री आहे. तसेच, मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान काँग्रेसचे काही आमदारही पक्ष सोडून भाजपमध्ये जाऊ शकतात.