अमरावती : ‘आली आली गौराई, सोन्यारूनप्याच्या पावलानं, आली आली गौराई, धनधान्याच्या पावलानं,’ शनिवारी सोनपावलांनी माहेरवाशीण ज्येष्ठा गौरींचे आगमन होणार आहे.गौरींच्या स्वागतासाठी महिला मंडळी सज्ज झाल्याचे दिसतेय.
मुहूर्त कोणता?
गणपती मांगल्याचे, तर महालक्ष्मी समृद्धीचे प्रतिक आहे.तिच्या प्रतिष्ठापनेनंतर घराघरामध्ये मांगल्य, सुख, समृद्धी, आनंद टिकून राहतो, अशी भाविकांची भावना आहे. माहेरवाशीण असलेल्या गौराई अनेक ठिकाणी पिढ्यापिढ्या बसवल्या जातात, तर काही ठिकाणी हौस म्हणून, तर काही घरी नवसाच्या म्हणून बसविल्या जातात. काही ठिकाणी पितळेचे, तर काही ठिकाणी मातीचे मुखवटे असलेल्या, तर काही ठिकाणी खड्यांच्या रुपात त्या बसविल्या जातात. दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होताच सर्वांना वेध लागतात ते ज्येष्ठा-कनिष्ठेच्या आगमनाचे. पंचागानुसार त्यांच्या आगमनाचा मुहूर्त रात्री 10 वाजून 56 मिनिटांनंतर असला, तरी मात्र महिलांसह अबालवृद्धांची एकच धावपळ दिसून येत आहे.