Breaking News

नागपूर हिंसाचारातील ८० आरोपींना जामीन मंजूर

नागपूर शहरातील महाल परिसरात काही महिन्यांपूर्वी उसळलेल्या हिंसाचार प्रकरणातील ८० आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने अटीसह जामीन मंजूर केला आहे. सोमवारी सत्र न्यायाधीश ए. आर. कुलकर्णी यांनी हा निर्णय दिला. यापूर्वी याच प्रकरणातील ९ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटींसह जामीन दिला होता. त्याच आदेशाचा दाखला देत जिल्हा न्यायालयाने उर्वरित ८० आरोपींचे जामीन अर्ज मंजूर केले.

 

जामीन मिळालेल्या आरोपींमध्ये मोहम्मद हारीश मो. इस्माईल, मोहम्मद शाहनवाज शेख, मोहम्मद युसूफ शेख, नसीम सलीम शेख यांच्यासह इतर आरोपींचा समावेश आहे. या सर्वांनी न्यायालयात स्वतंत्र जामीन अर्ज दाखल केले होते. याप्रकरणातील मुख्य आरोपी फहीम शमीम खान (वय ३८, रा. संजयबाग कॉलनी, नागपूर) याच्यासह अनेक आरोपींविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींच्यावतीने न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला की पोलिसांनी कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ गुप्त माहितीच्या आधारे त्यांना अटक केली. शिवाय, कथित मुख्य आरोपी फहीम खानच्या ‘सनी यूथ फोर्स’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा ते सदस्य नव्हते आणि ओळख परेडीत त्यांची कोणतीही ओळख पटलेली नाही. याच आधारावर आरोपींच्या वतीने जामीनाची मागणी करण्यात आली होती.

 

न्यायालयाने प्रत्येक आरोपीला १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अटीसह जामीन दिला. यामध्ये आरोपींना आठवड्यातून दोन वेळा संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावणे तसेच तपास व न्यायालयीन कार्यवाहीत सहकार्य करण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड. आसिफ कुरेशी, अॅड. रफीक अकबानी, अॅड. अश्विन इंगोले, अॅड. शाहबाज सिद्दीकी यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी युक्तिवाद केला.

 

फहीम खानबाबत ४ जुलै निर्णय

महल हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे नागपूर शहराध्यक्ष फहीम शमीम खान यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला आहे. यावर निर्णय ४ जुलै रोजी दिला जाण्याची शक्यता आहे. आरोपांनुसार, हिंसाचारात फहीम खानचे महत्वपूर्ण योगदान होते. हिंसाचार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी फहीम खानला पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून फहीम खान पोलिसांच्या ताब्यात आहे. हिंसाचारातील इतर आरोपींना जामीन मिळाल्यावर मुख्य आरोपीच्या जामीन अर्जाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About विश्व भारत

Check Also

प्यार मे पागल भांजे संग होटल में सुहागरात : पोल खुलते ही खाया जहर

प्यार मे पागल भांजे संग होटल में सुहागरात : पोल खुलते ही खाया जहर टेकचंद्र …

नाबालिका के दुष्कर्मि देहदानवों को पुलिस ने किया गिरफ्तार 

नाबालिका के दुष्कर्मि देहदानवों को पुलिस ने किया गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *