Breaking News

महसूल मंत्री बावनकुळेंच्या कामठी-मौदात मतचोरी : राहुल गांधींच्या आरोपानंतर ३ सप्टेंबरला थेट…

ज्येष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्या मतदारसंघाचा उल्लेख करत मतचोरीचा आरोप भाजप आणि निवडणूक आयोगावर सर्वप्रथम केला. त्या कामठी विधानसभा मतदारसंघातून प्रदेश काँग्रेस ‘व्होट चोर, गद्दी छोड’ अभियानाला सुुरुवात करणार आहे. त्यासाठी प्रदेश काँग्रेसची जाहीरसभा ३ सप्टेंबरला कामठी येथे आयोजित करण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यात कामठी मतदारसंघाचे उदाहरण दिले. त्यानंतर राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या महादेवपुरा येथील मतचोरीचे पॉवर पॉईन्ट प्रेझेंटेशन केले. आता ते बिहारमधील एसआयआरच्या विरोधात व्होटअधिकार यात्रेवर आहेत. बिहारामध्ये राहुल गांधी यांच्या यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

देशभरात भाजप आणि निवडणूक यांचे साटेलोटे आणि मतचोरीचा मुद्दा तापवण्याची रणनिती काँग्रेसने आखली आहे. महाराष्ट्रात देखील विभागीय पातळीवर ‘व्होट चोर, गद्दी छोड’ नारा घराघरात पोहोचवण्यासाठी काँग्रेस विभागीय आणि जिल्हा स्तरावर सभा, हस्ताक्षर मोहीम, मशाल यात्रा काढणार आहे. त्याची सुरुवात कामठी येथून ३ सप्टेंबर २०२५ ला होत आहे, अशी माहिती कामठी येथील सभेचे समन्वयक व काँग्रेस नेते रवींद्र दरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडधे, विधान परिषद सदस्य ॲड. अभिजीत वंजारी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीची अंतिम मतदार यादी जाहीर झाली. मतदारसंघात ३५ हजार मतदार वाढले. यात १२ हजार मतदार शेवटच्या तीन दिवसात वाढल्याचा आरोप पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांनी केला होता. महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान २०२४ मध्ये ३२ लाख मतदार जोडले गेले.

महाराष्ट्र निवडणुकीत अनेक गैरव्यवहार झाले आहेत. पंतप्रधानांनी निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धत बदलली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यात मतदार का वाढले? पाच वर्षात ४४ लाख मतदार असताना पाच महिन्यात ते ३९ लाख कसे झाले? त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेची फोटोसह मतदारयादी देण्याची मागणी करण्यात आली होती.

About विश्व भारत

Check Also

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ दुनिया का सबसे बडा एनजीओ: PM मोदी का कथन

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ दुनिया का सबसे बडा एनजीओ:PM मोदी का कथन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

अज्ञात कारणों से स्वतंत्रता दिवस समारोह में नहीं पहुंचे गांधी और खरगे

अज्ञात कारणों से स्वतंत्रता दिवस समारोह में नहीं पहुंचे गांधी और खरगे टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *