Breaking News

पशुधनावर लंपी स्किन डिसिज साथीचा प्रादुर्भाव

Advertisements

उसगाव येथे लसीकरण शिबिराचे आयोजन

Advertisements

यंग चांदा ब्रिगेडच्या युवती विभागाचा उपक्रमगावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisements

सध्या पशुधनावर लंपी स्किन डिसिज या विषाणूजन्य साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच या रोगाबाबत पशुपालकांमध्ये  जनजागृती करण्यासाठी  यंग चांदा ब्रिगेडच्या युवती विभागाच्या वतीने घुग्घुस जवळील उसगाव येते लसीकरण व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

उसगावच्या सरपंच्या निविता ठाकरे यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पी.स.दामले, यंग चांदा ब्रिगेडच्या युवती प्रमुख भाग्यश्री हांडे,  कृषीकन्या वैशाली पिदूरकर, साची कवाडे,  कृषिदूत संदेश ठाकरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

 निसर्गाची अवकृपा नेहमीच शेतकऱ्यांच्या पदरी येत असते. परिमाणी शेतपिकावर याचा मोठा परिणाम होत असतो. यातच आता विविध प्रकारच्या रोगाने शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला चढविला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. यात सध्या लंपी स्किन डिसिज साथीचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात अधिक वाढला आहे. हि बाब लक्षात घेता  यंग चांदा ब्रिगेडच्या युवती विभागाच्या पुढाकारातून उसगाव येथे लंपी स्किन डिसिज साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पी.स.दामले यांनी या साथीच्या रोगाबद्दल गावातील पशुपालकांना योग्य मार्गदर्शन केले.  जनावरांची व गोठ्याची स्वच्छता कशी ठेवावी यासह या शिबिरामध्ये रोगाचा प्रसार करणारे किटाणू, डास, गोचीड आणि माशा यांच्या निर्मूलनासाठी आवश्यक उपयोजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. गावकऱ्यांसह पशुपालकांचाही या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या युवती विभागाच्या सदस्यांची उपस्थिती होती.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

ग्रहस्थ जीवन में अर्धांगिनी को सुखमय रखने के लिए पूरी ईमानदारी से हाथी की तरह करें काम

ग्रहस्थ जीवन में अर्धांगिनी को सुखमय रखने के लिए पूरी ईमानदारी से हाथी की तरह …

कमलिनी जड़ की सब्जी का मटन से अच्छा लजीज स्वाद : चखकर मनपसंद लडका रिश्ता पक्का करेगा!

कमलिनी जड़ की सब्जी का मटन से अच्छा लजीज स्वाद : चखकर मनपसंद लडका रिश्ता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *