Breaking News

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधिताची संख्या 777

Advertisements

438 जणांना आत्तापर्यंत रुग्णालयातून सुटी

339 बाधितावर सध्या उपचार सुरू

चंद्रपूर, दि. 7 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्ण संख्येतील वाढ सातत्याने सुरू असून गेल्या 24 तासात त्यामध्ये 28 बाधिताची भर पडली आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 777 बाधित पुढे आले असून 438 जणांना आत्तापर्यंत रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. तर 339 बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत.

Advertisements

आज पुढे आलेल्या बाधितामध्ये 17 नागरिक अँटीजेन चाचणीतून पुढे आले आहेत. यामध्ये एकट्या बल्लारपूर शहरातील 15 लोकांचा समावेश आहे. तर उर्वरित एक जण चुना भट्टी वार्ड राजुरा येथील रहिवासी आहे. अॅन्टीजेन चाचणीत अन्य 17 वा बाधित चंद्रपूर  बसस्थानक परिसरात सिद्धार्थ हॉटेलजवळील आहे. या ठिकाणच्या 54 वर्षीय एका पुरुषाचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Advertisements

नियमित चाचणीद्वारे पुढे आलेल्या बाधितांमध्ये व्दारका मार्केट नगीनाबाग परिसरातील 36 वर्षे पुरुषाचा समावेश आहे. तर गोरक्षण वार्डातील 42 वर्षीय वर 23 वर्षीय महिलेचा देखील समावेश आहे. या दोन्ही महिला संपर्कातून पॉझिटिव्ह झाल्या आहेत.बल्लारपूर येथून श्रीराम वार्ड परिसरातून 13 वर्षीय मुलगा संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे. तर नागपूर येथून प्रवासाची नोंद असलेला माता नगर चंद्रपूर येथील 35 वर्षीय पुरुष तसेच पुणे येथून प्रवासाची नोंद असलेल्या 28 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे.

समता नगर परिसरातील 34 वर्षीय महिला तसेच गणेश नगर चंद्रपुर येथील 45 वर्षीय महिला संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे.

वरोरा येथील उत्तर प्रदेशातून प्रवास करून आल्याची नोंद असणारे सुभाष वार्ड परिसरातील 50 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. तर भद्रावती शहरातील वंधेरे सोसायटी येथील 26 वर्षीय युवक हा संपर्कातून पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे.

17अॅन्टीजेन चाचणीतून पुढे आलेले व नियमित चाचणीतून पुढे आलेल्या 11 बाधितांमुळे एकूण संख्या 28 झाली आहे.

जिल्ह्यात 11 हजार 208 नागरिकांची अँन्टीजेन तपासणी केलेली आहे. यापैकी 100 पॉझिटिव्ह असून 11 हजार 108 निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 91 हजार 562 नागरिक दाखल झालेले आहेत. जिल्ह्यामध्ये 1 हजार 217 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 1 हजार 620 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहेत.

वयोगटानुसार कोरोना बाधितांची संख्या:

जिल्ह्यातील बाधितांची संख्या 777 वर पोहोचली आहे. यापैकी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 15 बाधित, 6 ते 18 वर्ष वयोगटातील 56 बाधित, 19 ते 40 वर्षे वयोगटातील 482 बाधित, 41 ते 60 वर्षे वयोगटातील 191 बाधित, 61 वर्षावरील 33 बाधित आहेत. तसेच एकूण 777 बाधितांपैकी 554 पुरुष तर 223 बाधित महिला आहे.

 

राज्याबाहेरील, जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या:

 जिल्ह्यातील 681 बाधित आहे.जिल्ह्याबाहेरील 42 बाधित आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या 54 आहे. एकूण बाधितांची संख्या 777 झाली आहे.

 

जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन विषयक माहिती: जिल्ह्यात सध्या 76 कंटेनमेंट झोन सुरू आहेत. तर 85 कंटेनमेंट झोन 14 दिवस पूर्ण झाल्याने बंद करण्यात आलेले आहेत. या 85 कंटेनमेंट झोनचा सर्वेक्षण अहवाल पुढीलप्रमाणे आहे. 341 आरोग्य पथकाद्वारे 15 हजार 187 घरांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. यामधील एकूण सर्व्हेक्षित लोकसंख्या 24 हजार 611 आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

प्रभू श्रीराम पर अभद्र टिप्पणी के खिलाफ रामभक्तों का आंदोलन

  नागपूर,कोराडी। गत 16 अप्रैल की रात किसी अज्ञात तत्वों द्धारा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम के …

नागपूर : महादुला के श्रीवास नगर मे नि:शुल्क नेत्र जांच शिबीर को अच्छा-खासा प्रतिसाद

  ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री कोराडी।विश्ववंदनीय डा बाबासाहब आंबेडकर की 132 वें जन्मोत्सव उपलक्ष्य मे महादुला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *