Breaking News

आज फोन इन कार्यक्रमात  जिल्हा शल्य चिकित्सक

कोरोना आणि आरोग्य व्यवस्था विषयीचा संवाद

चंद्रपुर,दि. 7 ऑगस्ट: जिल्हा प्रशासनाने कोरोना जनजागृती संदर्भात आत्मभान अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत 5 ऑगस्ट रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी फोन इन कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांशी कोरोना आणि आरोग्य व्यवस्था या विषयावर संवाद साधला होता. या कार्यक्रमाचे प्रसारण दिनांक 8 ऑगस्ट शनिवारला सकाळी 10:30 वाजता आकाशवाणीवरून होणार आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या प्रादुर्भावाच्या काळामध्ये जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था तसेच आरोग्य विभागांतर्गत करण्यात आलेली उपायोजना कशी आहे. जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती काय आहे. वैद्यकीय पथके कशा पद्धतीने काम करीत आहे. असे अनेक प्रश्नांचं निरसन फोन-इन कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांनी केले आहे.

आकाशवाणी चंद्रपूरची निर्मिती असणाऱ्या या फोन-इन कार्यक्रमाचे आत्मभान अभिनांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाने नियोजन केले होते. या कार्यक्रमाचे प्रसारण दिनांक 8 ऑगस्ट शनिवारी सकाळी 10:30 वाजता आकाशवाणी केंद्र चंद्रपूर येथून होणार आहे. नागरिकांनी आकाशवाणी केंद्र चंद्रपूरच्या 103 मेगाहर्डस वर तसेच न्यूज ऑन एअर या ॲपवर प्रसारण ऐकावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *