Breaking News

गुवाहाटी दौरा का नाही? सत्तार म्हणाले, रश्मी ठाकरेंना करा मुख्यमंत्री

Advertisements

उद्धव ठाकरेंकडून लोकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांनी कोणतीही कामे केली नाहीत. किमान त्या खुर्ची वर बसणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा, असं मी म्हणालो होतो. रश्मी वहिनींना मुख्यमंत्री करा, असा प्रस्तावही मी ठेवला होता. कारण अडीच वर्षात काळात उद्धव ठाकरे फक्त 4 वेळा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलेले दिसले. मी मंत्री असूनही त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेलं बघितलं नाही. तर सर्वसामान्य लोकांना ते काय दिसणार?, असं म्हणत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.

Advertisements

ठाकरे घरणाच्या दुसऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करावं असं माझं मत होतं. मी मला मुख्यमंत्री करा म्हणालो नव्हतो, तर रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याबाबत बोललेलो. त्यामुळे शरद पवार आणि सोनिया गांधी यांनाही मान्य असायला हवं होतं, असं सत्तार म्हणालेत.

Advertisements

नाशिकचा माझा ठरलेला कार्यक्रम होता म्हणून गुवाहाटीला गेलो नाही. कुठेही विसंवाद नाही. सगळं चांगलं चाललं आहे, असं सत्तारानी स्पष्ट केलं.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

पश्चिम बंगाल में चुनाव पूर्व- पश्चात देखने मिलती है राजनीतिक हिंसा

पश्चिम बंगाल में चुनाव पूर्व- पश्चात देखने मिलती है राजनीतिक हिंसा टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *