Breaking News

पुण्याजवळ महाराष्ट्र एक्सप्रेसवर दगडफेक

Advertisements

गोंदियाहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसवर पुणेनजीक उरुळी कांचन येथे दगडफेक झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

Advertisements

घटनेत रेल्वेच्या एका डब्याच्या खिडकीची काच फुटली आहे. काचा बंद असल्यामुळे सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस 11040 गोंदियाहून सुटल्यावर दुसऱ्या दिवशी पुणे विभागात येते आणि त्यानंतर कोल्हापूरपर्यंत धावते. शुक्रवारी सायंकाळी ही गाडी पुणे विभागात दाखल झाली. उरुळी स्थानक परिसर येताच या गाडीवर अचानक दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.

Advertisements

घटनेची स्थानिक रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र, त्यांना दगडफेक झालेल्या ठिकाणी कोणीही सापडले नाही. या संदर्भात एका प्रवाशाने रेल्वे प्रशासनाला तक्रार केली होती.

घटनांमध्ये वाढ

रेल्वेवर दगडफेक करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या आठवड्यातच सिंहगड एक्सप्रेसवर कर्जत जवळ दगडफेकीची घटना घडली होती.त्या घटनेत एक तरुण प्रवासी चांगलाच जखमी झाला होता. ही घटना ताजी असताना शुक्रवारी दुसरी दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आहे का, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. यासोबतच दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

RSS सेवा प्रमुख को घर से घसीटकर ले गई पुलिस, गुस्साए लोगों ने थाने में किया हनुमान चालीसा का पाठ

RSS सेवा प्रमुख को घर से घसीटकर ले गई पुलिस, गुस्साए लोगों ने थाने में …

रात 3 बजे तक पुलिसकर्मियों ने किया कॉम्बिंग गश्त : शहर के एक-एक गली में पहुंचे

छत्तीसगढ़ रात 3 बजे तक पुलिसकर्मियों ने किया कॉम्बिंग गश्त, शहर के एक-एक गली में …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *