Breaking News

अमिताभसोबत काम केलेल्या अभिनेत्याला नागपुरातून अटक

Advertisements

नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या नागपुरातील प्रियांशू रवी क्षत्रिय या कलाकाराला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर चोरी आणि घरफोडीचा आरोप आहे. प्रियांशूनं झुंड सिनेमात बाबू ही भूमिका केली होती. ती चांगलीच गाजली होती.

Advertisements

नागपूरचे क्रीडा शिक्षक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित ‘झुंड’ हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. नागराज मंजुळे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यांनी सिनेमासाठी अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली मुलं शोधून काढली. त्यांना थेट अमिताभ बच्चनसोबत काम करण्याची संधी दिली. याच कलाकारांपैकी एक असलेल्या 18 वर्षांच्या प्रियांशूला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisements

प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटीतील प्रदीप हरबाजी मोडावे यांच्या घरी चोरी झाली होती. त्यावेळी चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे 75 हजारांचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी एका अल्पवयीनासह दोघांना अटक केली होती. चौकशीदरम्यान या घरफोडीत प्रियांशूही सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस मागावर असल्याचे पाहून प्रियांशू काही काळ फरार झाला होता. बाबू गड्डी गोदाम परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार मंगळवारी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याला 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रियांशूनं दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गड्डी गोदाम मधील कबुतरांच्या पेटीत लपवलेले दाग-दागिने पोलिसांनी जप्त केले बाबूंच्या चौकशीत आणखी काही घरफोड्याच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांशू गांजा पिताना आढळला होता. त्यावेळी सदर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई केली होती अशी माहिती मानकापूर पोलिसांनी दिली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

स्वतःला शहाणा समजणारा वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

वादग्रस्त विधानासाठी चर्चेत असणारे आमदार संजय गायकवाड यांनी वाघाचे नख आपण गळ्यात ठेवत असल्याचे विधान …

RSS सेवा प्रमुख को घर से घसीटकर ले गई पुलिस, गुस्साए लोगों ने थाने में किया हनुमान चालीसा का पाठ

RSS सेवा प्रमुख को घर से घसीटकर ले गई पुलिस, गुस्साए लोगों ने थाने में …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *