सिरीया व टर्कीत आलेल्या भूकंपाने हाहाकार माजवला होता. टर्की आणि सीरीया देशातील भूकंपात हजारो लोकांचे प्राण गेले असून, लाखो जखमी झाले आहेत. अद्यापही बचावकार्याची प्रक्रिया टर्कीत सुरु आहे. अशातच राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेने (एनजीआरआय) मोठा इशारा दिला आहे. उत्तराखंडमध्ये कधीही भूकंप होण्याची शक्यता एनजीआरआय संस्थेने व्यक्त केली आहे. तर, मुंबईला थोडाफार धोका आहे. नागपूरला कमी धोका असल्याचे म्हटले आहे.
एनजीआरआय संस्थेतील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र राव यांनी याबाबत माहिती दिली आहे. एन. पूर्णचंद्र राव यांनी सांगितलं की, “पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली विविध स्तर असतात, ज्यांची सतत हालचाल होत असते.
भारतातील पृष्ठभागाखालील स्तर प्रतिवर्षी ५ सेटींमीटरने सरकत आहे. याने दबाव निर्माण होत असून, मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.”
विश्वभारत News Website