Breaking News

ऊर्जामंत्र्यांच्या नागपूर शहरात १०७ वीजचोऱ्या उघड

ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात महावितरणच्या नागपूर शहर मंडळ आणि संचालन व सुव्यवस्था आणि भरारी पथकाने पाच दिवसांत १०७ वीजचोऱ्या उघडकीस आणल्या. ही कारवाई आणखी तिव्र करणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांच्या पत्रानंतर महावितरणने शहरात कारवाई केली आहे.

महावितरणच्या चमूने पाच दिवसांत भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये १०७ ग्राहकांकडील सुमारे ३१.६५ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली. सोबत कलम १२६ अन्वये ५ ग्राहकांकडील सुमारे १.३ लाखांची वीज अनियमितताही पुढे आणली.

कोणत्या भागात कारवाई?

शहरातील सिव्हिल लाइन्स विभागातील संघर्ष नगर,लश्करीबाग, यशोधरा नगर, महाल विभागातील ताजबाग व हसनबाग, गांधीबाग विभागातील मोमीनपुरा व अन्सार नगर आणि खोग्रेसनगर विभागातील जयताळा, हुडकेश्वर या भागातील वीज हानी अधिक असलेल्या वाहिन्यांवर ४ सप्टेंबरपासून ही मोहीम पोलीस बंदोबस्तात केली जात आहे.

महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहार रंगारी आणि मुख्य अभियंते दिलीप दोडके, शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांच्या देखरेखीत ही कारवी राजेश घाटोळे, समीर टेकाडे, राहुल जीवतोडे, हेमराज ढोके यांच्यासह त्यांची चमू करत आहे. तर, कामचुकार करण्याऱ्या दोन सहायक अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे.

About विश्व भारत

Check Also

भाजप आमदाराची समृद्धी महामार्गावरून नाराजी

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर पेट्रोल पंप, रेस्टॉररन्ट्स, हॉटेल्स नसल्याने होणाऱ्या गैरसोयींबाबत या मार्गावरून प्रवास करणारे नाराजी …

महाराष्ट्र के राजस्व मंत्री बावनकुळे के प्रयास से पैदल पार पथ निर्माण शुरु

महाराष्ट्र के राजस्व मंत्री बावनकुळे के प्रयास से पैदल पार पथ निर्माण शुरु टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *