Breaking News

अप्पर जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल : खाण मालकांकडून घ्यायचा पैसे

Advertisements

अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिट्टी व दगड खाणी सुरू ठेवण्यासाठी प्रमोद गायकवाड यांनी प्रत्येक महिन्याला लाचेची मागणी केली होती, असा गंभीर आरोप खाण मालक संघटनेने केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी चौकशी करून नऊ दिवसांनंतर प्रमोद गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणांत संभाषणाची एक ध्वनीफित देखील समाज माध्यमातून प्रसारित झाली. अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी हे आरोप फेटाळले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने चांगलीच खळबळ उडाली.

Advertisements

 

नेमकं प्रकरण काय?

Advertisements

अकोला जिल्ह्यात गौण खनिजाच्या असंख्य खाणी आहेत. या खाणींमधून दगड, गिट्टी, मुरूम काढला जातो. त्यापोटी गौण खनिज विभागाला स्वामित्वधन शुल्क प्राप्त होते. महसूल विभागाकडून गौण खनिज विभागाला वसुलीचे लक्ष्य दिल्या जाते. मार्च महिन्यात स्वामित्व शुल्क वसुलीची लगबग सुरू असतांना खाण मालक संघटनेने अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. खाणी सुरू ठेवण्यासाठी अपर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी प्रत्येकी १५ हजार रुपयांची मागणी करून धमकी दिल्याचा आरोप खाण मालकांनी केला.

 

खाणी बंद पाडण्याची धमकी

अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी वारंवार भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. संघटनेच्या सदस्यांना कार्यालयात बोलावून अपमानित केले. पैशांची मागणी केली. काही ठिकाणी स्वत: जाऊन वसुली देखील केली. सर्व खाणी बंद पाडण्याची धमकी सुद्धा दिली. या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे खाण मालक संघटनेकडून सांगण्यात आले.

 

पुरावा म्हणून एक ध्वनीफित

या तक्रारीसोबत पुरावा म्हणून एक ध्वनीफित पोलिसांना देण्यात आली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये खाणमालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर ९ दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर अप.नं. २७०/२०२६ कलम ३०८ (२), ३५१ (१), बीएनएस सह कलम ७ पीसीए नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागात चांगलीच खळबळ माजली आहे. दरम्यान, अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी हे आरोप फेटाळून लावत केवळ स्वामित्वधन शुल्क वसूल करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. या प्रकरणी सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नाबालिग का यौन शोषण कर बनाया वीडियो और मांगे 25 लाख

नाबालिग का यौन शोषण कर बनाया वीडियो और मांगे 25 लाख टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 …

डॉ.बाबासाहेब का अपमान करने वाली लड़की गिरफ्तार: प्रदर्शन जारी

डॉ.बाबासाहेब का अपमान करने वाली लड़की गिरफ्तार: प्रदर्शन जारी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   रायपुर। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *