Breaking News

शाकाहारात भारत अव्वल,4 पैकी 3 महिलांना आवडतो मांसाहार

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
शाकाहारींमध्ये भारत जगात अव्वल स्थानी आहे. म्हणजेच जगात शाकाहारी लोकांच्या यादीत भारत पहिल्या स्थानी आहे. संयुक्त राष्ट्राच्या फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार जगातील ‘टॉप 10’ शाकाहारी देशांमध्ये भारत अव्वल तर मेक्सिको दुसर्‍या स्थानावर आहे. या अहवालातील माहितीनुसार भारतातील सुमारे 42 टक्के लोक शाकाहारी आहेत. त्यानंतर मेक्सिको (19 टक्के), ब्राझील (14), तैवान (14) स्वित्झर्लंड (13), इस्त्राईल (10.3), न्यूझीलंड (10 टक्के) जर्मनी (10), स्वीडन (10) तर कॅनडामध्ये 9.4 टक्के लोक शाकाहारी आहेत.

Advertisements

भारताचा विचार केल्यास हरियाणा व राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात शाकाहारी आहेत. हरियाणामध्ये 56 टक्के महिला व पुरुष शाकाहारी आहेत. त्यानंतर छत्तीसगड, हिमाचल प्रदेशचा क्रमांक लागतो. असे असले तरी मांसाहार खाण्यात भारतात पुरुषाबरोबरच महिला जराही पिछाडीवर नाहीत. चारपैकी 3 महिलांना मांसाहार आवडतो. तर मांसाहार खाण्यामध्ये प. बंगाल, झारखंड, ओडिसा, बिहार ही राज्ये आघाडीवर आहेत.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

उन्हाळ्यात कूल, हायड्रेटेड राहण्यासाठी कोणते फळ फायदेशीर?लिंबू पाणी, आंबा, ताक आणि…!

उन्हाळ्यात अनेकांना डिहायड्रेशनची समस्या जाणवू लागली आहे. या सीझनमध्ये खाण्या-पिण्यात थोडासाही बदल झाला तरी त्याचे …

शरीर मे भरपूर रक्त बढाने और सेहत के लिए गुणकारी है लाल-लाल और हरे टमाटर

लाल या हरा टमाटर ऐसी सब्जी है जो सभी मौसम में बाजारों में मिलता है। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *