Breaking News

अ‍टॅकचे सर्वात मोठे कारण एकटेपणा : भावना व्यक्त करा, दीर्घ श्वास घ्या

Advertisements

एकटेपणा कधी आनंद तर कधी निराशेत घेऊन जाऊ शकतो. तसेच एकटेपणा हे पॅनिक अ‍ॅटॅकचे सर्वात मोठे कारण आहे. सतत चिंताग्रस्त व तणावग्रस्त राहिल्याने पॅनिक अ‍ॅटॅकचा धोका वाढतो. मनाची भीती किंवा मनातील भावना व्यक्त करू न शकल्यामुळे तो फोबिया किंवा ध्यास बनतो. याचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. विशेषतः बालके व किशोरवयीन मुलांना, मुलींना धोका जास्त असतो. विशीपर्यंत पॅनिक अ‍ॅटॅकचा धोका सर्वाधिक असतो. पुरुषांपेक्षा महिलांना याची शक्यता दुप्पट असते. पॅनिक अ‍ॅटॅक आणि हार्ट अ‍ॅटॅकची लक्षणे काही प्रमाणात सारखी असतात. अशा परिस्थितीत पॅनिक अ‍ॅटॅकच्या बाबतीत डॉक्टरांशी संपर्क साधा.

Advertisements

वर्तमानात जगणे हा पॅनिक अ‍ॅटॅकवर नियंत्रण ठेवण्याचा प्रभावी मार्ग

Advertisements

१) स्वतःशी बोला भूतकाळात पॅनिक अ‍ॅटॅक आला असेल तर तुम्हाला पुन्हा लक्षणे दिसू लागल्यावर तुम्ही भूतकाळात त्यावर मात केली आहे हे स्वतःला पटवून द्या. पॅनिक अ‍ॅटॅकमुळे जीवघेणा धोका निर्माण होत नाही, मग त्याची चिंता का? पॅनिक अ‍ॅटॅकला माॅनिटर करा.

२) दीर्घ श्वसन करा श्वास घेताना छातीऐवजी पोट फुगवा. यामुळे श्वास दीर्घ आणि खोल होतो. त्यामुळे मेंदूपर्यंत अधिक ऑक्सिजन पोहोचू शकतो. पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था हे संकेत देण्यास मदत करते की, परिस्थितीशी लढण्याची गरज नाही.

३) भावना व्यक्त करा मित्र किंवा कुटुंबातील सदस्याशी बोला. तुम्हाला सध्या कसे वाटते किंवा तुमच्या शरीरात तुम्हाला कोणत्या संवेदना होत आहेत याचे वर्णन करा. एखाद्या प्रिय व्यक्तीशी बोलल्याने लक्षणे अधिक लवकर कमी होण्यास मदत होते.

४) एक ग्लास पाणी प्या पॅनिक अ‍ॅटॅकच्या प्रसंगी त्याच्या लक्षणांमुळे व्यक्ती चिंताग्रस्त होते. अशा स्थितीत एक ग्लास थंड पाणी पिणे तुम्हाला सध्याच्या स्थितीत आणण्यास मदत करते. याशिवाय अति उष्मा किंवा घाम येणेदेखील कमी होते.

काय आहे पॅनिक अ‍ॅटॅक?

काही अज्ञात भीतीमुळे शारीरिक आणि मानसिक लक्षणे दिसतात तेव्हा त्याला पॅनिक अ‍ॅटॅक म्हणतात. त्याची लक्षणे कोणती? अचानक हृदयाचे ठोके वाढणे, धाप लागणे, सुन्न होणे किंवा थरथरणे, छाती जड होणे आणि गुदमरल्यासारखे वाटणे ही मुख्य लक्षणे आहेत. काहींना घाम येतो किंवा थंडी वाजते. -बचावाचा मार्ग कोणता? पॅनिक अ‍ॅटॅक टाळण्यासाठी त्याचा मागोवा घ्या. योगाची मदत घ्या. मानसोपचारतज्ज्ञ किंवा मानसशास्त्रज्ञ मनोवैज्ञानिक शिक्षणाद्वारे भीतीवर मात करण्यास मदत करू शकतात.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

सुसनी साग के उपयोग से शिथिल नसों और शरीर की हड्डियों में चट्टान जैसी ताकत

सुसनी साग के उपयोग से शिथिल नसों और शरीर की हड्डियों में चट्टान जैसी ताकत …

तरबूज खाने के बाद हुई उल्टियां और दस्त? युवती की मौत से मचा हड़कंप

तरबूज खाने के बाद हुई उल्टियां और दस्त? युवती की मौत से मचा हड़कंप   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *